शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या शेतीविराेधी धाेरणामुळे शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST

कवठेमहांकाळ : केंद्र शासनाच्या शेतीविरोधी धोरणामुळे आज देशातील शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आता भाजप सरकारला धडा ...

कवठेमहांकाळ : केंद्र शासनाच्या शेतीविरोधी धोरणामुळे आज देशातील शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आता भाजप सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. भविष्यात सहकारी खरेदी-विक्री संघ आणि बाजार समित्या मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.

कवठेमहांकाळ येथे साेमवारी शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीच्या नेत्या अनिता सगरे, संस्थेचे अध्यक्ष सुरगौड पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

जयंत पाटील म्हणाले की शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळली पाहिजे. यासाठी यापुढील काळात राज्य सरकार प्रयत्नशील राहील. शेतकरी संघाचे अध्यक्ष सुरगौड पाटील यांनी अडचणीच्या काळात शेतकरी संघाचे अस्तित्व टिकवले आहे. हे त्यांचे मोठे काम आहे. आपण त्यांना शेतकरी संघ बळकट करण्यासाठी पूर्ण ताकद देऊ.

यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे म्हणाले. आजवरच्या राजकीय कारकिर्दीत शेतकऱ्यांना व त्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा यासाठी लढलो. भविष्यात ही हा लढा सुरूच राहील.

राष्ट्रवादीच्या नेत्या अनिता सगरे म्हणाल्या. शेतकरी सहकारी संघ हे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासाचे केंद्र आहे. हे केंद्र टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी जयंत पाटील यांनी सहकार्य करावे.

शेतकरी संघाचे अध्यक्ष सुरगौड पाटील यांनी स्वागत केले. यावेळी उपाध्यक्ष संभाजी पवार, सचिव मनोज पाटील, गणपती सगरे, दत्ताजीराव पाटील, युवा नेते शंतनू सगरे, नगराध्यक्ष पंडित दळवी, गजानन कोठावळे, मोहन खोत, अय्याज मुल्ला, पांडुरंग पाटील, टी. व्ही. पाटील, बाळासाहेब पाटील, अमित शिंत्रे, सौरव पाटील, प्रवीण कुनुरे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो : २५ केएम १

अेाळ : कवठेमहांकाळ येथील शेतकरी सहकारी संघाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी अजितराव घोरपडे, अनिता सगरे, सुरगौड पाटील उपस्थित हाेते.