शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

घोरपडे-खाडेंमध्ये टोकाचा संघर्ष

By admin | Updated: October 5, 2014 23:09 IST

कार्यकर्त्यांचा सवतासुभा : नाराजीचा मिरजेत फटका

मिरज : माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तरी, मिरज पूर्व भागातील घोरपडे समर्थक कार्यकर्ते राष्ट्रवादीचा प्रचार करीत असल्याने, घोरपडे व आमदार सुरेश खाडे यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. घोरपडे समर्थक अद्याप भाजपच्या प्रचारात सहभागी नसल्याने खाडे अस्वस्थ आहेत. मिरज पूर्व भागातील २८ गावांत माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या समर्थकांचा गट आहे. विकास आघाडीच्या माध्यमातून कार्यरत असलेला गट घोरपडे यांच्यासोबत राष्ट्रवादीत गेला. गत विधानसभा व लोकसभा निवडणुकीत घोरपडे समर्थक गटाने भाजपला उघड मदत केल्याने भाजपला चांगलाच फायदा झाला होता. खासदार संजय पाटील व घोरपडे यांचे सख्य असल्याने घोरपडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून गृहमंत्र्यांविरोधात भाजपची उमेदवारीही मिळाली. मात्र घोरपडे यांच्या पक्षप्रवेशामुळे मिरज विधानसभेसाठी भाजपला फायदा होईल, ही भाजप नेत्यांची अपेक्षा फोल ठरली आहे. घोरपडे समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश न करता, त्यांचा राष्ट्रवादी गट शाबूत ठेवला आहे. त्यांचे समर्थक राष्ट्रवादीच्या प्रचारात सहभागी असल्याने मिरजेत भाजपला फटका बसण्याची भीती आहे. युती तुटल्याने शिवसेना उमेदवारामुळे मत विभागणीचा धोका असल्याने मिरज पूर्व भागातील गावांत घोरपडे समर्थकांच्या मदतीची सध्या भाजपला मोठी गरज आहे. पूर्व भागातील गावांत प्रत्येक निवडणुकीत घोरपडे समर्थक भाजपचे काम करीत असल्याने तेथे भाजपचे पक्षसंघटन नगण्य आहे. घोरपडे समर्थकांच्या मदतीशिवाय पूर्व भागातील मताधिक्य मिळविणे अवघड होणार आहे. भाजपअंतर्गत नवीन व जुने असे परस्परांवर कुरघोड्यांचे राजकारण सुरू झाल्याने घोरपडे समर्थक भाजपच्या प्रचारात सहभागी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. (वार्ताहर)खाडेंची खासदारांकडे तक्रारघोरपडे यांच्या खेळीमुळे अस्वस्थ झालेल्या आ. खाडे यांनी याबाबत खासदारांकडे तक्रार केल्याची माहिती मिळाली. खासदारांच्या मध्यस्थीनंतर घोरपडे व आ. खाडे यांची बैठक होऊन राष्ट्रवादी कार्यकर्ते भाजपचाच प्रचार करतील, अशी खात्री घोरपडे यांनी आ. खाडे यांना दिली. मात्र त्यानंतरही कार्यकर्ते अद्याप भाजपच्या प्रचारापासून दूरच असल्याने घोरपडे व आ. खाडे यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे.