शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Top Marathi News LIVE Updates: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीला १२ कोटींचा ‘शॉक’

By admin | Updated: June 1, 2015 00:20 IST

वादळी फटका : १६८ फिडर बंद; सहाशे गावांचा वीज पुरवठा खंडित

अंजर अथणीकर - सांगली -जिल्ह्यात शुक्रवारी आलेल्या वादळी पावसाने वीज कंपनीचे जवळपास १२ कोटींचे नुकसान झाले. या वादळी पावसाने १६८ एक्स्प्रेस फिडर बंद पडले. त्यामुळे जवळपास सहाशे गावे व वाड्या-वस्त्यांमधील वीज पुरवठा खंडित झाला. वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करुन जवळपास सर्वच गावांतील वीज पुरवठा पूर्ववत केला आहे. आता कर्मचारी कृषी क्षेत्रातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आणखी दोन दिवसात सर्वच ठिकाणचा वीज पुरवठा पूर्ववत होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजेचे लोखंडी व सिमेंटचे खांब मोडून पडले. झाडे उन्मळून पडल्याने वायरी तुटल्या. एक्स्प्रेस फिडर खराब झाले. सर्वाधिक फटका कवठेमहांकाळ तालुक्याला बसला आहे. या तालुक्यात लघुदाब वाहिनीचे १५ खांब व उच्च दाब वाहिनीचे तीन खांब मोडून पडले आहेत. प्रत्येक तालुक्यात चार ते पाच खांब मोडून पडले आहेत. झाडे व त्यांच्या फांद्या तुटून पडल्याने शंभरहून अधिक ठिकाणी वायरिंग तुटले आहे. सांगलीमध्ये मिरज रस्त्यावरील मार्केट यार्ड परिसरात, विश्रामबाग गणपती मंदिरासमोरील झाड विजेच्या तारांवर कोसळले. त्याचबरोबर त्रिकोणी बागेजवळील झाडाची मोठी फांदी इलेक्ट्रीक खांबावर पडल्याने चारही बाजूच्या विजेच्या तारा तुटल्या. अद्याप या परिसरातील खांब उभारणी व वायरिंग दुरुस्ती सुरु आहे. वादळी पावसाने जिल्ह्यातील ११ के.व्ही.चे १६८ फिडर बंद पडले आहेत. एका फिडरवरून जवळपास चार ते पाच गावांना वीज पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे जवळपास सहाशेहून अधिक गावे व वाड्या-वस्त्यांवर गेल्या दोन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होता. प्रथम शहर भागातील, त्यानंतर ग्रामीण व त्यानंतर कृषी क्षेत्रातील विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे. आता सर्वच गावांचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.निवृत्तीनंतरही सेवा...वीज कंपनीचे १९ कर्मचारी आज (रविवार) सेवानिवृत्त झाले. हे निवृत्त होणारे कर्मचारीही आज विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील होते. शुक्रवारी रात्रीपासून वीज कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम केले. त्यामुळेच विद्युत पुरवठा तात्काळ सुरु करण्यास मदत झाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी पी. एम. राठोड यांनी दिली.