शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

मिरज पंचायत समितीच्या उपसभापतीची १७ फेब्रुवारीला निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:48 IST

उपसभापती दिलीपकुमार पाटील यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त आहे. १७ फेब्रुवारी रोजी ही ...

उपसभापती दिलीपकुमार पाटील यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त आहे. १७ फेब्रुवारी रोजी ही निवड होणार आहे. भाजपने टाकळीचे सदस्य किरण बंडगर यांना उपसभापतीची संधी देण्याचे निश्चित झाले आहे. चार महिन्यानंतर उपसभापतिपदाचा उर्वरित कालावधी विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांना देण्याचा निर्णय भाजप नेत्यांनी सभापती निवडीवेळी घेतला होता. मात्र तत्पूर्वी विरोधी काँग्रेसच्या गोटात उपसभापतीची निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे झाल्यास सत्ताधारी भाजपला ही निवडणूक आव्हानात्मक होणार आहे. भाजपची दोन अपक्ष सहयोगी सदस्यासह १२, काँग्रेसची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका सहयोगी सदस्यासह आठ, राष्ट्रवादी एक असे सदस्यांचे पक्षीय बलाबल आहे. भाजपकडे बहुमत असल्याने उपसभापती भाजपचा होणार असे चित्र आहे. काँग्रेसने उपसभापतीची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे सत्ताधारी भाजप नेत्यांच्या अस्तित्वाची ठरणार आहे. भाजपचे काही सदस्य ही निवड बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील असले तरी पक्षांतर्गत नाराजी मिटविण्यात ते कितपत यशस्वी होतात यावर निवडीचे भवितव्य अवलंबून आहे.

चौकट

निवडीवर ग्रामपंचायत निवडणुकीचे पडसाद शक्य

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपमध्ये फूट पडली. अनेक गावांत पक्षांतर्गत दोन गट एकमेकांविरोधात लढले. भाजप नेत्यांनी एकोप्यासाठी प्रयत्न केले नाही अथवा राजकीय पाठबळ देण्यात दुजाभाव केल्याच्या भावनेतून भाजपमधील एक गट नाराज आहे. तो पंचायत समितीच्या राजकारणाशी निवडीत असल्याने नाराजीचे पडसाद उपसभापती निवडीवर उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नाराजीचा फटका भाजपला बसणार की विरोधी काँग्रेस याचा लाभ घेत सत्तेत चमत्कार घडविणार या बदलत्या राजकारणाकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.