शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Top Marathi News LIVE Updates: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

जतमधील आठ गावांना टॅँकरने पाणी

By admin | Updated: June 1, 2015 00:21 IST

दहा टँकर सुरू : शासनाकडून अत्यल्प पाणीपुरवठा; माणसी चाळीस लिटरची मागणी

जयवंत आदाटे -जत -तालुक्यातील ८ गावे व त्याखालील ६२ वाड्या-वस्त्यांवरील ३५ हजार १२० नागरिकांनी प्रतिदिवस दहा टॅँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. शासनाकडून होत असलेला पाणीपुरवठा अत्यल्प असून, २० लिटर पाण्यातून दैनंदिन गरज पूर्ण होत नाही. शासनाने या नियमात बदल करून माणसी चाळीस लिटरप्रमाणे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी टॅँकर सुरू असलेल्या गावातील नागरिकांमधून होत आहे.दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. विहिरी, तलाव, नाले, विंधनविहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. प्रत्येकवर्षी २५ मे अखेरपर्यंत एक-दोन मोठे अवकाळी पाऊस होत होते. यावर्षी काही भागातच तुरळक प्रमाणात पाऊस झाला आहे. उर्वरित भागात पाऊस झाला नाही. मे महिन्यातील अवकाळी पाऊस व त्यानंतर वातावरणात बदल होऊन पश्चिमेकडून -पूर्वेकडे जोरदार गार वारे वाहत होते. याशिवाय उन्हाची तीव्रता कमी होऊन आकाशात सतत काळे ढग तयार होत होते. त्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता कमी होती; परंतु यावर्षी मे महिना संपत आला असता तरी जत तालुक्यातील वातावरणात बदल झाला नाही. हवेतील उष्णता कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस त्यात वाढ होऊ लागली आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर, येथील पाणीटंचाईची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे प्रशासनाला टॅँकरच्या संख्येत वाढ करावी लागणार आहे, अशी भीती येथे व्यक्त केली जात आहे.खोजानवाडी, उमराणी, डफळापूर, अमृतवाडी, सिंदूर, काराजनगी, उटगी, बिळूर ही आठ गावे आणि त्याखालील ६२ वाड्या-वस्त्यांवर दहा टॅँकरच्या २७ खेपा प्रशासनाने मंजूर केल्या आहेत. दहा टॅँकरपैकी चार टॅँकर शासकीय, तर सहा टॅँकर खासगी आहेत. खासगी टॅँकरची क्षमता बारा हजार लिटर, तर शासकीय टॅँकरची क्षमता दहा हजार लिटर इतकी आहे. नादुरुस्त टॅँकर, लांब अंतरावरील पाणी उद्भव ठिकाण, वीज दाबनियमन व गळके टॅँकर यामुळे मंजूर २७ पैकी २५ किंवा २६ खेपांचे पाणी नागरिकांना मिळत आहे. शासकीय नियम प्रतिमाणसी वीस लिटर इतका असला, तरी प्रत्यक्षात पंधरा ते अठरा लिटर पाणी नागरिकांना मिळत आहे. शासन निर्मलग्राम, स्वच्छता अभियान व हागणदारीमुक्त गाव या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. प्रतिमाणसी वीस लिटर पाण्यातून दैनंदिन गरजा पूर्ण करून आम्ही शासकीय योजनांची कशी अंमलबजावणी करणार, असा प्रश्न अमृतवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विठ्ठल पवार यांनी उपस्थित केला आहे. मागील कित्येक वर्षांपासून टंचाई कालावधित वीज लिटर प्रतिमाणसी पाणी पुरवठा करावा, असा जुना शासकीय नियम आहे. या नियमात आता शासनाने बदल करावा किंवा लोकप्रतिनिधींनी त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.मंजूर खेपांपेक्षा कमी पाणीखोजनवाडी, उमराणी, डफळापूर, अमृतवाडी, सिंदूर, काराजनगी, उटगी, बिळूर ही आठ गावे आणि त्याखालील ६२ वाड्या-वस्त्यांवर दहा टॅँकरच्या २७ खेपा प्रशासनाने मंजूर केल्या आहेत.नादुरुस्त टॅँकर, लांब अंतरावरील पाणी उद्भव ठिकाण, वीज दाबनियमन व गळके टॅँकर यामुळे मंजूर २७ पैकी २५ किंवा २६ खेपांचे पाणी नागरिकांना मिळत आहे.