शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात महावितरणच्या वीजतोडणीला आठ दिवसांचा ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:29 IST

ओळ : तासगाव येथे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना महेश खराडे, गुलाब यादव, सचिन पाटील, दामाजी डुबल यांनी निवेदन दिले. तासगाव ...

ओळ : तासगाव येथे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना महेश खराडे, गुलाब यादव, सचिन पाटील, दामाजी डुबल यांनी निवेदन दिले.

तासगाव : वीजबिलाच्या थकबाकीपोटी तोडण्यात आलेली शेतकऱ्यांची वीज पुन्हा जोडावी. तसेच वीजतोडणीची कारवाई त्वरित थांबविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी महावितरणला निवेदन दिले. यानंतर पुढील आठ दिवसांसाठी कारवाई थांबविण्याचे तसेच आतापर्यंत तोडलेली वीज कनेक्शन जोडण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले. आठ दिवसांत थकबाकी न भरल्यास पुन्हा कारवाईचा इशारा उपकार्यकारी अभियंता सिकंदर मुल्ला आणि भारत व्हनमाने यांनी दिला.

थकबाकीदार शेतकऱ्यांच्या ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई तासगाव तालुक्यात सुरू झाली आहे. तासगाव, धुळगाव, मतकुणकी, मांजर्डे, आरवडे, सावळज, वायफळे यांसह अनेक गावांत ट्रान्स्फॉर्मरचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. बुधवारी महावितरणच्या कारवाईचा निषेध करीत ‘स्वाभिमानी’ने बुधवारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाध्यक्ष महेश खराडे, तालुकाध्यक्ष अध्यक्ष दामाजी दुबल, युवा आघाडीचे अध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष गुलाबराव यादव, संदीप शिरोटे, शिवाजी पाटील, सूरज पाटील, पोपट उपाध्ये, आशिष पाटील, समीर तांबोळी, वसंत उपाध्ये, कुमार माळी, अमोल गव्हाणकर, मोहन पाटील, चंद्रकांत शिंदे, आदींसह शेतकरी तासगाव येथील महावितरण कार्यालयात जमले. महेश खराडे यांनी उपकार्यकारी अभियंता भारत व्हनमाने आणि सिकंदर मुल्ला यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सांगितल्या. आतापर्यंत तोडलेली कनेक्शन जोडा अशी मागणी केली. वीज बिल भरण्यासाठी आठ दिवसांची मुदत द्या, तसेच टप्पे पाडून द्या, अशी भूमिका मांडली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कारवाईला आठ दिवसांचा ब्रेक देण्याचे आश्वासन दिले. तोडलेली सर्व कनेक्शन तातडीने जोडण्याची ग्वाही दिली.