शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या दसऱ्याला वाहन विक्रीचा ‘टॉप गिअर’, सांगली जिल्ह्यात किती कोटींची झाली उलाढाल.. वाचा

By घनशाम नवाथे | Updated: October 9, 2025 16:35 IST

जीएसटी कपातीचा परिणाम

घनश्याम नवाथे सांगली : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर जीएसटी दरातील कपातीमुळे वाहन विक्री सुसाट वेगाने झाल्याचे दिसून आले. घटस्थापना ते दसरा कालावधीत सांगली जिल्ह्यात तब्बल २८८३ वाहनांची विक्री झाली. जीएसटी दरातील कपातीमुळे यंदाच्या वर्षात वाहन विक्रीने गतवर्षीच्या तुलनेत ‘टॉप गिअर’ टाकल्याचे दिसले. त्यामुळे वाहन उद्योग क्षेत्राला मोठा ‘बूस्टर’ मिळाला. जिल्ह्यात तब्बल ११० कोटींहून अधिक उलाढाल या क्षेत्रात झाली.गेल्या काही वर्षांत वाहनांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे दुचाकी असो की मोटार असो ती खरेदी करणे अनेकांसाठी स्वप्नवत ठरले आहे. दुचाकीची किंमत लाखाच्या पलिकडे पोहोचली आहे. मोटारींच्या किमतीदेखील साधारणपणे सहा लाखांपासून पुढे आहेत. साधारणपणे आठ वर्षांपूर्वी वाहनांच्या खरेदीसाठी जीएसटी आकारला जात आहे. त्यामुळे किमती वाढल्या होत्या. परंतु, यंदाच्या दसऱ्यापूर्वी जीएसटी दरात कपात निश्चित केल्यामुळे अनेकांना वाहन खरेदीचे स्वप्न साकारण्याची संधी मिळाली.वाहन वितरकांनी प्रत्येक वाहन जीएसटी कपातीमुळे किती रुपयांना मिळणार? याची आकडेवारी जाहिरातरूपाने प्रसिद्ध केली. त्याचा परिणाम म्हणून ग्राहकांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर दारात नवीन गाडी आणण्यासाठी उत्साह दाखवला. अनेक शोरूममध्ये बुकिंगसाठी गर्दी दिसून आली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्त साधताना जिल्ह्यात घटस्थापना ते दसरा या कालावधीत तब्बल २८८३ वाहनांची विक्री झाली. यामध्ये दुचाकींची सर्वाधिक विक्री झाली. त्यापाठोपाठ मोटार, ट्रॅक्टर, मालवाहतूक करणारी वाहने यांची विक्री अधिक झाली. दसऱ्यानंतर आता दिवाळी पाडव्यालादेखील मोठ्या प्रमाणात वाहन विक्री होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

गतवर्षीपेक्षा ६४६ वाहनांची विक्री जास्तगतवर्षी घटस्थापना ते दसरा या कालावधीत २२३७ वाहनांची विक्री झाली होती. यंदा जीएसटी दरातील कपातीमुळे गतवर्षीच्या तुलनेत ६४६ वाहनांची विक्री जास्त झाली. यंदा २८८३ वाहनांची विक्री झाली. तसेच काही कमी ‘सीसी’ आणि वेग असलेल्या गाड्यांचीदेखील विक्री झाली आहे.

जीएसटी कपातीचा परिणामछोट्या मोटारीवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला. तसेच ३५० सीसीपर्यंतच्या दुचाकीवरील जीएसटीदेखील २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी केला. परिणामी मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला. त्यांनी खरेदीसाठी फायनान्सची मदत घेऊन उत्साह दर्शवला.

३० हजारांपासून ३० लाखापर्यंत कपातदारात चारचाकी आणण्याचे अनेकांचे स्वप्न असते. ते यंदाच्या दसऱ्याला पूर्ण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दसऱ्यानिमित्त अनेकांनी ३० हजारांपासून ते ३० लाखांपर्यंत जीएसटी कपातीचे सोने लुटले.

वाहन विक्रीचा उच्चांकवाहनाचा प्रकार - विक्रीदुचाकी - १८७०मोपेड - २०मोटार -  ७२५ट्रॅक्टर  - ११३मालवाहतूक - ०५ट्रेलर - १४प्रवासी वाहतूक - १४इतर वाहने - २२एकूण - २८८३

गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या दसऱ्याला वाहन उद्योगात मोठी उलाढाल झाल्याचे चित्र दिसून आले. गतवर्षी घटस्थापना ते दसरा या कालावधीत जेवढ्या गाड्यांची आरटीओकडे नोंदणी झाली होती, त्यातुलनेत यंदा ६४६ जादा गाड्यांची नोंद झाली आहे. -प्रसाद गाजरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली.