शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात समितीअभावी निराधार वाऱ्यावर

By admin | Updated: July 20, 2015 00:04 IST

संजय गांधी योजना : दहा महिन्यांपासून कामकाज ठप्प

सांगली : भाजप-शिवसेना आघाडीची सत्ता येऊन जवळपास दहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी, अद्याप सांगली शहराची संजय गांधी निराधार योजनेची शहर समिती नियुक्त न झाल्याने, निराधारांना वाऱ्यावर सोडले आहे. योग्य लाभार्थी शासकीय पेन्शनपासून वंचित आहेत. संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना आदी योजनांद्वारे निराधार, वृध्द व विधवा, परित्यक्तांना सहाशे रुपयांपासून दीड हजारापर्यंत मासिक पेन्शन दिली जाते. नवे शासन सत्तेवर आल्यानंतर नवी समिती नियुक्त करण्यात येते. भाजप-शिवसेना आघाडी सत्तेवर येऊन जवळपास दहा महिन्यांचा कालावधी होत आला तरी, शासनाने ही समिती नियुक्त केलेली नाही. सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा काँग्रेसने नियुक्त केलेली संजय गांधी योजना समिती बरखास्त केली. यामुळे निराधारांसाठी नवे प्रस्ताव पाठविण्याचे काम ठप्प झाले आहे. सध्या मिरज प्रांतांना नवे प्रस्ताव मंजूर करण्याचे काम दिले आहे. प्रांतांंना आधीच कामाचा अतिरिक्त ताण असल्याने या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे.संजय गांधी समितीमध्ये विशेषत: राजकीय कार्यकर्त्यांची वर्णी लावली जाते. हे कार्यकर्ते जेणेकरून अधिक याचे लाभार्थी कसे होतील, याकडे लक्ष देतात. अनेक निराधार निरक्षर असल्यामुळे त्यांना या योजना माहीत नसतात. कार्यकर्ते अशा लाभार्थींना शोधून त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या कागदपत्रांचीही पूर्तता करण्यासाठी अनेक कार्यकर्ते प्रयत्न करतात. त्याचबरोबर एखाद्याचे पेन्शनचे काम अडल्यानंतर त्याचे काम अडण्याचे कारण शोधून त्याच्या पूर्ततेसाठीही ते प्रयत्नशील असतात. त्यामुळे या योजनांची व्याप्ती वाढून लाभार्थींची संख्या वाढते. आता मात्र हे काम पूर्णपणे ठप्प आहे. शासकीय कर्मचारी केवळ आलेले अर्जच योग्य की अयोग्य, याची पडताळणी करतात. त्यामुळे या योजनेचा प्रसार आणि प्रचार ठप्प झाला आहे.संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार अनिता देशमुख म्हणाल्या की, या योजनेची समिती नियुक्ती करावी, असा प्रस्ताव पाठविला आहे. याला लवकरच मंजुरी मिळेल. निराधार लाभापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येत आहे. या योजनांच्या प्रसारासाठीही आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी प्रचार रथही फिरवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)आदेश देऊनही तीन महिने उलटलेजिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही समिती तात्काळ नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. सांगलीच्या आमदारांनी पुढाकार घ्यावा, असे आदेशही त्यांनी मे महिन्यामध्ये झालेल्या बैठकीत दिले होते. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. पालकमंत्र्यांच्या शिफारशीनंतर ही समिती नियुक्त करण्यात येते. त्यांच्याकडे अद्याप सदस्यांची यादीच गेली नसल्याचे समजते. शिराळ्याची समिती मात्र यापूर्वीच नियुक्त झाली आहे.