शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
6
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
7
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
8
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
9
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
10
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
11
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
12
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
13
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
14
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
Daily Top 2Weekly Top 5

ड्रेनेज घोटाळ्याची चौकशी तहसीलदारांकडे!

By admin | Updated: September 18, 2015 00:08 IST

राष्ट्रवादीच्या तक्रारीची दखल : आराखडाबाह्य कामे महापालिकेस भोवणार

सांगली : महापालिकेच्या ड्रेनेज योजनेतील घोटाळ्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत या घोटाळ्याचा चौकशीसाठी मिरजेचे तहसीलदार किशोर घाडगे यांची नियुक्ती केल्याचे समजते. लवकरच घाडगे हे ड्रेनेज घोटाळ्याची चौकशी करणार आहेत. विभागीय आयुक्तांनी त्यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. विकास महाआघाडीच्या काळात सांगली व मिरज या दोन शहरातील ड्रेनेज योजना मंजूर झाली होती. सांगलीसाठी ७७ कोटी, तर मिरजेसाठी ५६ कोटींच्या आराखड्याला शासनाने मंजुरी दिली. जादा दराच्या निविदेमुळे ड्रेनेज योजनेचा खर्च दोनशे कोटींच्या घरात पोहोचला आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. एमजीपीच्या देखरेखीखाली ड्रेनेज योजनेचे काम सुरू आहे. ड्रेनेजच्या कामातील अनियमिततेवर अनेकदा वाद रंगला होता. या कामाचा महासभा, स्थायी समिती सभेत अनेकदा पंचनामा करण्यात आला आहे. ठेकेदाराला एप्रिल २०१५ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत होती, पण आजअखेर ३५ ते ४० टक्केच काम झाले आहे. अजूनही अनेक भागात ड्रेनेजच्या पाईपलाईन टाकलेल्या नाहीत. उलट ठेकेदारांची बिले मात्र प्रशासनाकडून वेळोवेळी अदा केली जात आहेत. त्यात मिरजेतील १६ किलोमीटर जादा पाईपलाईन टाकण्यात आल्याचे उघड झाले. ड्रेनेजच्या मूळ आराखड्यात समाविष्ट नसलेली कामे प्रशासन व एमजीपीच्या आशीर्वादाने सर्वात आधी पूर्ण करण्यात आली. या कामापोटी ठेकेदाराला साडेतीन ते चार कोटींचे बिलही अदा करण्यात आले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी समक्ष योजनेची पाहणी केली. त्यानंतर ड्रेनेज योजनेतील या घोटाळ्याबाबत माजी मंत्री जयंत पाटील यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांनी या घोटाळ्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी अधिकारी नियुक्तीचे आदेश पुणे विभागीय आयुक्तांना देण्यात आले होते. त्यांनी चौकशी अधिकारी म्हणून मिरजेचे तहसीलदार किशोर घाडगे यांची नियुक्ती केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. येत्या दोन ते तीन दिवसात त्यांना आदेश प्राप्त होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)अद्याप आदेश नाहीत : घाडगेमिरजेतील ड्रेनेज घोटाळ्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तहसीलदार घाडगे यांची नियुक्ती केल्याचे वृत्त गुरुवारी दिवसभर शहरात होते. याबाबत घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणात आपणाला चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केल्याचे कोणतेही आदेश मिळालेले नसल्याचे सांगितले.