शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

ड्रेनेजचा कासवगतीने कारभार

By admin | Updated: November 23, 2014 00:44 IST

वाहतूक विस्कळीत : वाहनधारक, नागरिकांचे हाल

सांगली : ड्रेनेजसाठी मोठी खुदाई करताना पाईपलाईनचे काम करून तातडीने रस्ता पूर्ववत करण्याबाबत तत्परता दिसत नसल्याने शहरात अनेक ठिकाणची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. खणभागातही छोट्या बोळांमध्ये झालेल्या खुदाईमुळे नागरिकांना ये-जा करणेही मुश्किल झाले आहे. कॉलेज कॉर्नरवरून चारही दिशांना ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. याठिकाणी ड्रेनेजच्या पाईपलाईनसाठी खुदाई करण्यात आली. ही खुदाई करताना कुठेही बॅरिकेटस् लावण्यात आलेले नव्हते. त्यामुळे पहिल्यादिवशी वाहनधारकांची तारांबळ उडाली. गत रविवारी याचठिकाणी एक ट्रक अडकला. वाहनांची दाटी गेली आठवडाभर सुरू आहे. ड्रेनेजची पाईपलाईन टाकल्यानंतर केवळ मुरुमाचे ढिगारे करून रस्त्यात अडथळा करण्यात आला. ड्रेनेजमधून बाहेर फेकले गेलेले पाणी याठिकाणच्या रिक्षा थांब्यावर मोठ्या प्रमाणावर साचून राहिले आहे. चारही बाजूंनी येणाऱ्या वाहनांना या चौकात कसरत करीत पुढे जावे लागत आहे. खणभाग परिसरात केसरे गल्लीत सध्या ड्रेनेजसाठी मोठी खुदाई केली आहे. याठिकाणी गेली आठवडाभर कासवगतीने काम सुरू आहे. दाट लोकवस्ती असल्याने याठिकाणच्या नागरिकांना वाहने लावण्यासाठी आधीच अपुरी जागा होती, आता पूर्ण रस्ताच खोदल्याने नागरिकांना वाहने दूर लावून कसरत करीत घर गाठावे लागत आहे. रोजची ये-जा करतानाही मुश्किल झाले आहे. आधुनिक साहित्य असतानाही इतक्या मंदगतीने कामे कशी सुरू आहेत, असा सवाल आता नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. महापालिकेचे या कामांवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. रस्त्यांची कामे करण्यापूर्वी खुदाईची, पाईपलाईनची कामे करण्याबाबतचा ठराव महापालिकेत झाला होता. त्यानुसार भविष्यात कामे होणे आवश्यक आहे. अन्यथा रस्त्यांवर केलेला खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे. नियमांचे पालन नाहीरस्ते आणि ड्रेनेजच्या कामाबाबतचे ठोस नियोजन सध्या महापालिकेकडे नसल्याचे दिसून येत आहे. कोणते काम किती दिवसात पूर्ण होणार, कोणत्या ठेकेदारामार्फत ते काम सुरू आहे, किती खर्चाचे काम आहे, याबाबतची माहिती कोणालाही नाही. नागरिकांसाठी माहिती फलक प्रत्येक कामाच्या ठिकाणी लावणे आवश्यक असताना त्या गोष्टीही टाळण्यात येत आहेत.