शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये साखरमाळांना दुप्पट भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लॉकडाऊनमध्ये माल पडून राहण्याच्या भीतीमुळे अनेक उत्पादकांनी कमी साखरमाळा तयार केल्या. तरीही मागणीत वाढ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : लॉकडाऊनमध्ये माल पडून राहण्याच्या भीतीमुळे अनेक उत्पादकांनी कमी साखरमाळा तयार केल्या. तरीही मागणीत वाढ झाल्याने व मालाची उपलब्धता कमी असल्याने गतवर्षाच्या तुलनेत साखरमाळांना यंदा लॉकडाऊनमध्ये दुप्पट भाव मिळाला.

मिठाईच्या दुकानांमधून व होलसेल व्यापाऱ्यांकडून साखरमाळांची विक्री केली जात आहे. गतवर्षी १०० रुपये किलो दराने विकल्या गेलेल्या साखरमाळांना यंदा २०० रुपये किलो भाव मिळाला आहे. त्यामुळे ज्या उत्पादकांनी माळा तयार केल्या त्यांच्यासाठी पाडव्याचा गोडवा यंदा वाढला आहे. गतवर्षी साखरमाळांच्या विक्रीस अडचणी आल्या होत्या. तसेच दरही फारसा मिळाला नसल्याने उत्पादकांच्या पदरी निराशा होती. यंदा पाडव्याने उत्पादकांना साखरमाळेच्या दराचा गोडवा अनुभवास दिला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या राज्यभरात वाढत असल्याने लॉकडाऊन होणार, हे सर्वांनी गृहीत धरले होते, मात्र त्याचे स्वरूप काय असेल, याची कोणालाही कल्पना नव्हती. कोणत्या गोष्टी सुरू राहणार, कोणत्या बंद राहणार, याचा अंदाज नव्हता. त्यामुळे साखरमाळा उत्पादकांनी दरवर्षीपेक्षा ४० टक्के कमी साखरमाळा तयार केल्या. काही उत्पादकांनी साखरमाळा तयारच केल्या नाहीत. अशातच निर्बंध व वीकेंड लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर अचानक पाडव्याच्या माळांना मागणी वाढली. त्याची विक्री सुरू झाली. उपलब्धता कमी असल्याने दरवाढ झाली. सध्या बाजारात १८० ते २०० रुपये किलो दराने साखरमाळा विकल्या जात आहेत. पाडव्यापर्यंत यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.

कोट

मागील वर्षीपेक्षा यंदा दर जास्त आहे; मात्र साखरमाळांची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे पुरवठा करताना अडचणी येणार आहेत. आतापासून अनेक विक्रेते माळांची मागणी करीत आहेत.

- ज्ञानेश्वर जाधव, साखरमाळा उत्पादक, सांगली