सांगली महापालिकेच्या संग्रहालयात पक्ष्यांऐवजी गाढवांचा वावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 13:16 IST2026-05-18T13:15:55+5:302026-05-18T13:16:13+5:30

पिंजऱ्यात पक्षी नाहीत, भंगार मात्र ठासून भरले

Donkeys roam around instead of birds in the Sangli Municipal Museum | सांगली महापालिकेच्या संग्रहालयात पक्ष्यांऐवजी गाढवांचा वावर

सांगली महापालिकेच्या संग्रहालयात पक्ष्यांऐवजी गाढवांचा वावर

सांगली : महापालिकेने मोठ्या थाटामाटात सुरू केलेल्या पक्षी संग्रहालयाची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. संग्रहालयाच्या परिसरात पक्ष्यांऐवजी गाढवांचा वावर वाढला आहे. पक्ष्यांच्या पिंजऱ्यात भंगार आणि निरूपयोगी वस्तू तशाच पडून आहेत. पक्षी संग्रहालयाचे उद्घाटन होऊन दीड महिना लोटला तरी पक्ष्यांचा किलबिलाट अजूनही ऐकू आलेला नाही.

महापालिका मुख्यालयालगतच्या प्रतापसिंह उद्यानात २.१६ कोटी रुपये खर्चून पक्षी संग्रहालय उभारण्यात आले आहे. यात पक्ष्यांसाठी नवीन पिंजरे, जाळी, बेड काँक्रीट, शेड, पक्ष्यांची घरटी, पाणी व खाद्य साठवण्याचे भांडार, पक्ष्यांची माहिती देणारे फलक, लाॅन, बगीचा आदींचा समावेश होता. संग्रहालयाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच तत्कालीन आयुक्त सत्यम गांधी यांची बदली झाली. पदभार सोडण्यापूर्वी म्हणजेच ५ एप्रिल रोजी तत्कालीन आयुक्त गांधी, महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत या पक्षी संग्रहालयाचे लोकार्पण करण्यात आले. 

पण त्यानंतर संग्रहालयाच्या कामात कुठलीच प्रगती झालेली नाही. फेब्रुवारी महिन्यापर्यंत काम पूर्ण होऊन पक्षी संग्रहालय सांगलीकरांसाठी खुले होईल, अशी आशा होती. पण आता मे महिना संपत आला तरी या संग्रहालयात पक्ष्यांचा किलबिलाट काही ऐकू आलेला नाही. त्यात आता तिथे गाढवांचा वावरही दिसून आल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यासाठी संग्रहालय परिसरात भेट दिली असता, तेथे पक्ष्यांऐवजी गाढवांचा वावर दिसून आल्याने त्यांनी उपरोधिक शब्दांत महापालिकेवर टीका केली. ते म्हणाले, ‘पक्षी संग्रहालयात पक्ष्यांचा आवाज ऐकायला गेलो होतो; मात्र तेथे गाढवांचाच आवाज ऐकून परतावे लागले. संग्रहालय परिसरातील मोठ्या पिंजऱ्यांमध्ये पक्ष्यांऐवजी टाकाऊ साहित्य, भंगार आणि विविध निरूपयोगी वस्तू साठवून ठेवण्यात आल्या आहेत.

महापालिकेने पक्षी संग्रहालय उभारण्यासाठी मोठा खर्च केला होता. मात्र, देखभाल आणि व्यवस्थापनाअभावी हा प्रकल्प सध्या दुर्लक्षित अवस्थेत गेल्याचे चित्र आहे. गाढव संग्रहालय आणि टाकाऊ साहित्याचे अनोखे संग्रहालय उभे केल्याबद्दल महापालिकेचे शतशः आभार,’ असा उपरोधिक टोला सतीश साखळकर यांनी लगावला. यामुळे महापालिकेच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Web Title : सांगली महानगरपालिका के पक्षी संग्रहालय में पक्षियों की जगह गधों का बसेरा

Web Summary : सांगली का करोड़ों का पक्षी संग्रहालय दुर्दशाग्रस्त है। पक्षियों की जगह गधे घूम रहे हैं। एक महीने पहले उद्घाटन हुआ, कबाड़ जमा है, पक्षी नहीं, जनता की आलोचना हो रही है।

Web Title : Sangli Municipal Corporation's bird museum has donkeys, not birds.

Web Summary : Sangli's bird museum, costing crores, is in disrepair. Instead of birds, donkeys roam. Inaugurated a month ago, it houses scrap, not birds, drawing public criticism.