शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जांभळेवाडीतील उच्च शिक्षित दाम्पत्याच्या विजयाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : जांभळेवाडी (ता. शिराळा) येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यशास्त्र विषयात पीएच.डी. मिळवलेले डॉ. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : जांभळेवाडी (ता. शिराळा) येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यशास्त्र विषयात पीएच.डी. मिळवलेले डॉ. सचिन मरळे विजयी झाले. स्थानिक राजकारणात तरुण, सुशिक्षित लोक येत नाहीत, याबद्दल अनेक वेळा चर्चा होते. आता यात हळूहळू बदल होतोय, हेच मरळे यांच्या विजयाने सिद्ध झाले आहे.

जांभळेवाडी गावातसुद्धा दोन नवे चेहरे सध्या चर्चेत आहेत. डॉ. सचिन हैबती मरळे आणि त्यांच्या पत्नी रेश्मा सचिन मरळे. दोघेही उच्चशिक्षित आहेत.

सचिन मरळे यांनी राज्यशास्त्रातून पीएच.डी. मिळवली आहे, तर त्यांच्या पत्नी वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत. सचिन मरळे यांचा पीएच.डी.साठी ‘सांगली जिल्ह्यातील विकासाचे राजकारण’ हा संशोधनाचा विषय आहे. सचिन मरळे यांना संशोधनासाठी आयसीएसएसआर या संस्थेची फेलोशिप मिळाली होती. या निवडणुकीत पती-पत्नी दोघेही एकाच वेळी निवडून आल्याने मरळे कुटुंबात आनंदी वातावरण आहे.

सचिन मरळे हे उच्चशिक्षित असले, तरी त्यांचे शेतीवरसुद्धा विशेष लक्ष आहे. सध्या त्यांच्याकडे चार एकर शेती आहे. याचसोबत पशुपालन व्यवसायही ते नेटाने करत आहेत. गावातील युवापिढीला शेतीत नवीन प्रयोग करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते सांगतात. गावात वाचनालय असावे, अभ्यासिका असावी यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.

कोट

आमच्या अख्ख्या पिढीत कुणीही कधीही राजकारणात सहभाग घेतला नाही. एकदा मोठ्या मुलाने निवडणूक लढवली होती, मात्र तो निवडून आला नाही. या वेळी मात्र एकाच वेळी मुलगा आणि सून दोघे निवडून आल्याने खूप आनंद झाला आहे.

- हैबती मरळे (सचिन यांचे वडील)

फोटो-२९सचिन मरळे