शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विंधन विहीरींच्या कामात अडचणी

By admin | Updated: June 11, 2015 00:37 IST

जलव्यवस्थापन समिती सभेत उघड : केवळ ७५ कामांना कार्यारंभ आदेश

सिंधुदुर्गनगरी : पाणीटंचाईच्या २१५ मंजूर कामांपैकी आतापर्यंत केवळ ७५ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. मात्र संबंधितांकडून वेळीच जागेची बक्षिसपत्र करून मिळत नसल्याने पाणीटंचाईच्या विंधन विहिरीच्या कामांना अडचणी येत असल्याची माहिती बुधवारी जलव्यवस्थापन समिती सभेत उघड झाली.जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, उपाध्यक्ष रणजित देसाई, शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्यासह समिती सदस्य, खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ५ कोटी ७५ लाखांचा तीन गावे ६५९ वाड्यांचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा बनविण्यात आला आहे. यामध्ये पाणीटंचाईच्या प्राप्त प्रस्तावामधून प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या २१५ कामांपैकी आतापर्यंत केवळ ७५ कामांनाच कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. तर एकूण २१५ मंजूर कामांमध्ये १३७ विंधन विहिरी, १० विंधन विहिर दुरुस्ती, ३० विहिरीचा गाळ काढणे, ३० नळपाणी योजना दुरुस्ती व ८ तात्पुरत्या नळपाणी योजनांच्या कामांचा समावेश आहे. तर या कामांसाठी २ कोटी ३६ लाख ४८ हजार एवढा निधी खर्च करण्यात आला आहे. ३६ विंधन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली असून त्यापैकी ३१ यशस्वी ठरली आहेत तर अन्य दुरुस्ती व गाळ काढण्याची कामे सुरु आहेत. विंधन विहिरीची कामे १३७ मंजूर असली तरी यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे बक्षिसपत्र वेळीच करून मिळत नसल्याने मंजूर होऊनही कामे रखडली आहेत. पाणीटंचाईच्या कामांची मागणी होत असली तरी स्थानिक पातळीवरून बक्षिसपत्र व अन्य कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सहकार्य मिळत नसल्याने पाणीटंचाईच्या कामात अडचणी येत असल्याची माहिती सभेत देण्यात आली.लघुपाटबंधारे विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्ह्यात १३८ लाखांची २२ कामे सुरु करण्यात आली आहेत. तसेच देवगड-विजयदुर्ग नळपाणी योजनेच्या पाणीपट्टी वसुलीपेक्षा या योजनेवर खर्चच जादा येत आहे. त्यामुळे या योजना तोट्यात चालवाव्या लागत असल्याची माहिती सभेत देण्यात आली.जिल्ह्यातील १६४० पाणी नमुने तपासले असता त्यामध्ये ८१ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. मात्र या सर्व पाणीस्त्रोतांचे शुद्धीकरण करण्यात आले असल्याची माहिती सभेत दिली. (प्रतिनिधी)सिंधुदुर्ग जिल्हा हागंदारीमुक्तीकडेसिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापही ३३ गावे हागंदारीमुक्त झालेली आहेत. त्यामध्ये काही कुटुंबांकडे शौचालय नाहीत. मात्र येत्या २ आॅक्टोबर रोजी जिल्हा हागंदारीमुक्त म्हणून जाहिर केला जाणार आहे. त्यासाठी शिल्लक काम तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देत त्यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे असे आवाहन सभेत करण्यात आले.