शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वाळूअभावी कोट्यवधींची विकास कामे ठप्प

By admin | Updated: January 30, 2015 23:18 IST

खानापूर तालुक्यातील चित्र : शासकीय कामांसह खासगी बांधकामेही रेंगाळली

दिलीप मोहिते - विटा खानापूर तालुक्यात वाळूअभावी अनेक शासकीय कामांना ब्रेक लागला असून, वाळू मिळत नसल्याने कोट्यवधी रुपयांची विकास कामे ठप्प झाली आहेत. परिणामी, विटा शहरासह खानापूर तालुक्यातील खासगी बांधकामेही रेंगाळली असल्याने बांधकाम मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यात वाळू ठेक्यांचा लिलाव झाला नसल्याने वाळू उपसा व वाहतुकीस बंदी असल्याने तालुक्यात अनेक ठिकाणी खासगीसह शासकीय कामेही संबंधित ठेकेदारांनी बंद ठेवल्याने कामे मुदतीत पूर्ण न झाल्यास मार्च एंडच्या तोंडावर ठेकेदारही अडचणीत येण्याचे संकेत आहेत.  खानापूर तालुक्यात येरळा नदीपात्रातून वाळू उपसा केला जातो. सध्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश नसल्याने वाळू उपसा बंद आहे. जो वाळूची तस्करी करून वाळू वाहतूक करीत असेल, तो मात्र यातून मोठ्या प्रमाणात मालामाल होत असल्याची चर्चा आहे. येरळा नदीपात्राच्या कार्यक्षेत्रातील हिंगणगादे, कान्हरवाडी, चिखलहोळ, माहुली, भाळवणी, कमळापूर, बलवडी (भा.) यासह अन्य ठिकाणांहून वाळू उपशासाठी महसूल प्रशासनाच्यावतीने रितसर परवाना दिला जातो. परंतु, परवाना बंद होऊन आठ ते नऊ महिने झाले तरी वाळू उपसा सुरू झाला नाही. त्यामुळे ठेकेदारांसह खासगी बांधकामधारकांना वाळू मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर कामे ठप्प झाली आहेत. खानापूर तालुक्यात तालुका कृषी विभागाच्यावतीने मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून आरसीसी सिमेंट बंधाऱ्यांची कामे सुरू आहेत. परंतु, या कामांनाही वाळू मिळत नसल्याने ही कोट्यवधी रुपयांची विकास कामे पैसे असूनही ठप्प आहेत, तर विटा शहरातील सेंट्रिंग व परप्रांतीय मजुरांवर सरकारी व खासगी बांधकामे थांबल्याने उपासमारीची वेळ आली आहे.जिल्हा प्रशासनाने कृष्णा नदीपात्रातील वाळूचा लिलाव ९ फेब्रुवारीला करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा लिलाव होण्यापूर्वी येरळा नदीपात्रातून वाळू उपसा सुरू झाल्यास त्याचा परिणाम लिलाव प्रक्रियेवर होऊ शकतो. त्यामुळे दि. ९ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच तालुक्यातील वाळू उपशासाठी रितसर परवानगी मिळेल, असा अंदाज एका महसूल कर्मचाऱ्याने व्यक्त केला.मजुरांवर उपासमारीची वेळ...खानापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय बांधकाम मजूर स्थायिक झाले आहेत. त्यात सर्वाधिक ७० ते ७५ टक्के बांधकाम मजूर एकट्या विटा शहरात आहेत. नेवरी नाका, शिवाजी चौक, चौंडेश्वरी मंदिर चौक, तासगाव नाका, विवेकानंदनगर, शाहूनगर, डॉक्टर कॉलनी यासह शहराच्या अन्य भागात हे मजूर सध्या राहात आहेत. परंतु, वाळूअभावी गेल्या अनेक महिन्यांपासून या मजुरांना काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे; तर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी शासकीय विकासकामेही सुरू आहेत. पण वाळू मिळत नसल्याने कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांनाही ‘ब्रेक’ लागला आहे.