कंपनीच्या सांडपाण्यामुळे झाडांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:25 IST2021-04-11T04:25:52+5:302021-04-11T04:25:52+5:30

कुपवाड : मिरज एमआयडीसीतील टर्मरिक क्लस्टर प्रा.लि. (प्लाॅट नंबर ८९) या कंपनीतून बाहेर सोडलेले सांडपाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास ...

Damage to trees due to company sewage | कंपनीच्या सांडपाण्यामुळे झाडांचे नुकसान

कंपनीच्या सांडपाण्यामुळे झाडांचे नुकसान

कुपवाड : मिरज एमआयडीसीतील टर्मरिक क्लस्टर प्रा.लि. (प्लाॅट नंबर ८९) या कंपनीतून बाहेर सोडलेले सांडपाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वृक्षारोपण केलेल्या राखीव प्लाॅटमध्ये जात असल्याने झाडांचे नुकसान होत आहे. हे सांडपाणी त्वरित बंद न केल्यास कंपनीचा पाणीपुरवठा बंद केला जाईल, असा इशारा एमआयडीसीचे उपअभियंता के.जे. सनदी यांनी कंपनीला दिलेल्या नोटीसमध्ये दिला आहे.

मिरज एमआयडीसीतील आपल्या कंपनीतील सांडपाणी कंपनीच्या शेजारी असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वृक्षारोपण केलेल्या राखीव प्लाॅटमध्ये जात आहे. या सांडपाण्यामुळे वृक्षारोपण केलेली व सात ते आठ फूट उंच वाढलेली झाडे जळून गेली आहेत. त्यामुळे झाडांचे नुकसान झाले आहे. एमआयडीसीने यापूर्वी तीन वेळा नोटीस देऊन दुर्लक्ष केल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन आपल्या कंपनीने केले आहे. नोटीस मिळताच १० दिवसांच्या आत कंपनीतून बाहेर पडणारे सांडपाणी कंपनीच्या आवारात सांडपाणी प्रकल्प राबवून त्याद्वारे त्याची विल्हेवाट लावावी. अन्यथा, कंपनीचा पाणीपुरवठा खंडित केला जाईल, असा इशाराही उपअभियंता सनदी यांनी कंपनीला दिला आहे.

Web Title: Damage to trees due to company sewage