शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक दिनाची केवळ औपचारिकता!

By admin | Updated: December 25, 2014 00:09 IST

हक्कापासून वंचितच : सर्व विभागांकडूृन आदेशाला केराची टोपली

सांगली : राष्ट्रीय ग्राहक दिनाची प्रशासनाकडून केवळ औपचारिकता पूर्ण केली जात आहे. केवळ या एका दिवशी व्याख्याने व प्रात्यक्षिके दाखवून वर्षभर ग्राहकांंना प्रबोधनापासून वंचित ठेवण्यात येत आहे. ग्राहकांना त्यांचे हक्क, अधिकारांची जाणीव होण्यासाठी सर्व विभागांनी जनजागृती मोहीम राबवावी, अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिल्या असतानाही, या आदेशाला सर्वांनीच केराची टोपली दाखवली आहे. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आज (बुधवार) सांगलीत व्याख्यान, गॅस एजन्सी, वजन-मापे आदींची प्रात्यक्षिके ठेवण्यात आली होती. हा दिन पाटबंधारे, वीज मंडळ, साखर कारखाने, सर्व महामंडळांनी साजरा करावा, वर्षभर विविध कार्यक्रम राबवून ग्राहकांचे प्रबोधन करण्यात यावे, अशा सूचना असतानाही, या जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला सर्व खात्यांनी केराची टोपली दाखवली आहे. ग्राहक पंचायतीच्या राज्याच्या अध्यक्षांनी जिल्हा दौरा केला होता. त्यावेळी सर्व विभागात ग्राहकांच्या असणाऱ्या अधिकाराबाबत नियमावली लावण्यात यावी, असा आदेश त्यांनी दिला होता. त्याही सूचनांचे कोणी पालन केले नाही.सांगली जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांपासून ग्राहक परिषदेचे गठन करण्यात आलेले नाही. या परिषदेचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतात. त्यावरील अशासकीय सदस्य नेमण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना असतात. या परिषदेमध्ये ग्राहकांच्या व्यापक हितासाठी तक्रारी करण्यात येतात. मात्र ही परिषदच नसल्यामुळे ग्राहकांनी तक्रार कोठे करायाची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. डिझेल, पेट्रोल स्वस्त झाले असताना, रिक्षा, बसभाडे का कमी झाले नाही?, दूध खरेदीचे दर कमी झाले असताना, विक्रीचे दर का उतरले नाहीत? अशा व्यापक हिताच्या तक्रारींची दखल या ग्राहक परिषदेमध्ये घेण्यात येते. विशेष म्हणजे आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये ही परिषद गठित असताना सांगली जिल्ह्यामध्ये मात्र गेल्या दहा वर्षांपासून ही समिती रखडली आहे. (प्रतिनिधी)न्यायालयाच्या आदेशाकडेही दुर्लक्ष पालकमंत्री नियुक्त नसल्यामुळे सांगली जिल्ह्यात ग्राहक परिषद स्थापन करण्यात आलेली नाही. याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामध्ये, पालकमंत्री नसतील, तर प्रशासनाने या परिषदेवरील सदस्य नियुक्त करावेत, असा आदेश दिला आहे. या आदेशाकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशाने या परिषदेवरील सदस्य नियुक्त करण्यात येतात. यामुळे तज्ज्ञ सदस्यांऐवजी या समितीवर राजकीय कार्यकर्त्यांचीच अनेकदा वर्णी लागत आहे.