शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर...

By admin | Updated: November 23, 2014 00:45 IST

नागरिकांचे बळी : महापालिका यंत्रणा कोलमडली, आरोग्य विभागाच्या कारभाराचे धिंडवडे

मिरज : मिरज शहरातील दूषित पाणीपुरवठ्याचा व स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाल्याने शहरात गॅस्ट्रो, कॉलरा व डेंग्यूच्या साथीने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. भरलेल्या कचरा कुंड्या, ड्रेनेज तुंबल्याने रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी व शहरातील अवैध कत्तलखान्यांमुळे नागरिकांचे बळी जात असताना, महापालिकेची आरोग्य यंत्रणा मात्र पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन करीत आहे. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची साथ आटोक्यात येत नसल्याने महापालिका आरोग्य विभागाच्या कारभाराचे धिंडवडे निघत आहेत.मिरजेत पाणी पुरवठा वाहिन्या व ड्रेनेज वाहिन्या जुन्या व जीर्ण झाल्याने गळती होऊन सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे. गेले दोन आठवडे शहरातील विविध भागात दूषित पाणी पुरवठा होत असताना पाणी पुरवठा व ड्रेनेज विभागाला दूषित पाण्याची गळती सापडलेली नाही. शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. रस्त्याकडेला साचलेले कचऱ्याचे ढीग, रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी, शहरात अवैधरित्या सुरू असलेल्या कत्तलखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. साचलेल्या सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरातील अस्वच्छता नागरिकांच्या जिवावर बेतत असताना, महापालिका आरोग्य विभाग मात्र सुस्त आहे. अपुरे कर्मचारी व कामचुकार अधिकारी असल्याने शहरातील कचरा वेळीच उचलण्यात येत नाही. तुंबलेल्या ड्रेनेज वाहिन्यांची स्वच्छता करून सांडपाणी रस्त्यांवर व सखल भागात साचणार नाही, याची उपाययोजना करण्यात आलेली नाही. नियमित स्वच्छता केली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. शहरात रहिवासी परिसरात अवैध कत्तलखान्यांकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी आहेत. मोकाट व भटक्या कुत्र्यांचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो व कॉलऱ्याच्या साथीने दररोज बळी जात आहेत. शेकडो रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरिकांसह लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांनी तक्रार केल्यांनतर तात्पुरती स्वच्छता केली जाते. नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी अधिकारीच कार्यालयात हजर नसतात. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचा बळी गेल्याने महापालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जैलाब शेख यांनी केली.पन्नास वर्षांपूर्वीच्या यंत्रणेवर पाणीपुरवठ्याची यंत्रणाअस्वच्छतेमुळे नागरिकांच्या जिवास धोका निर्माण झाला असताना, महापालिका आरोग्य विभागाला केव्हा जाग येणार, असा नागरिकांना प्रश्न पडला आहे. शहराला पिण्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या सुमारे ५० वर्षे जुन्या पाणीपुरवठा यंत्रणेवर वाढत्या लोकसंख्येचा मोठा ताण आहे. मात्र सुधारित नळपाणीपुरवठा योजना गेली पंधरा वर्षे रखडल्याने दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे वारंवार साथीचे आजार उद्भवत आहेत. महापालिका आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आल्याने शहरातील वारंवार तुंबणारे ड्रेनेज व स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याबाबत उपाययोजना करणे आवश्यक ठरले आहे.