सांगली : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे एकमेकांकडे बघण्यावरून झालेल्या भांडणात सागर गायकवाड रा. करंटे बोळ, कसबे मध्यस्थी करणाऱ्या सागर संजय गायकवाड (वय ३२, डिग्रज) याचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी संशयित संस्कार सचिन आळतेकर (वय १९, रा. आदिनाथनगर, चौथी गल्ली, कसबे डिग्रज) व हर्षवर्धन गिरीश चव्हाण (वय १९, रा. गणपती मंदिरजवळ, कसबे डिग्रज) या दोघांना सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे, तर अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले आहे.
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास कसबे डिग्रज येथील धैर्यशील करंटे याच्याकडे एका अल्पवयीन युवकाने रागाने बघितले. त्यामुळे धैर्यशील याने त्याला काय पाहतोस असे विचारले. त्यावर 'थांब तुला दाखवतो, काय पाहतो ते' अशी धमकी देऊन तो युवक तेथून गेला.
या प्रकारानंतर धैर्यशील हा मृत सागर गायकवाड यांच्या घरासमोरील कट्टयावर बसला होता. सव्वासातच्या सुमारास संशयित संस्कार आळतेकर, हर्ष चव्हाण व अल्पवयीन युवक असे तिघेजण आले. त्यांनी धैर्यशीलबरोबर वाद घालताना सागरने मध्यस्थी केली. त्यामुळे त्यांनी सागर याला काठीने मारहाण केली व ते निघून गेले.
रात्री साडेनऊच्या सुमारास सागर गायकवाड हा समडोळी रस्त्याकडे दुचाकीवरून गेला. सागरला दुचाकीवरून जाताना त्याचे चुलत चुलते संदीप नारायण गायकवाड यांनी पाहिले. थोड्या वेळापूर्वी सागरची भांडणे झाल्याचे त्यांनी पाहिले होते. त्यामुळे सागर एकटा कोठे चालला? म्हणून ते त्याच्या शोधात निघाले.
दरम्यान, खराटे यांच्या शेताजवळ सागर गेल्यानंतर तिघेजण त्याठिकाणी आले. तेव्हा संस्कार आळतेकर याने त्याच्याकडील चाकू काढून सागर याच्या छातीवर आणि डोक्यात वार केले. तेवढ्यात सागरचे चुलते संदीप गायकवाड तेथे आले. त्यांनी संस्कारला सागरला मारू नकोस, सोड त्याचा जीव जाईल, असे सांगितले. तरीही संस्कारने त्याच्या छातीवर आणि डोक्याच्या पाठीमागे वार करून तो पळून गेला.
जखमी सागर गायकवाड याला नागरिकांच्या मदतीने तातडीने सिव्हिलमध्ये उपचारास दाखल केले. तेथून मिरजेतील खासगी हॉस्पिटलमध्ये हलवले; परंतु उपचार सुरू असताना पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याबाबत चुलते संदीप गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.
दरम्यान, खुनाची माहिती मिळताच सांगली शहर विभागाचे उपअधीक्षक संदीप भागवत, सांगली ग्रामीण ठाण्याच्या सहायक निरीक्षक कल्याणी शिंदे यांनी उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी, भिजित पाटील नंदू पवार, शेखर पवार आदींसह घटनास्थळी भेट दिली.
Web Summary : In Sangli, a 32-year-old man was stabbed to death for mediating a dispute. Police arrested two suspects and detained a minor. The incident stemmed from an argument over staring, escalating into a fatal attack despite the victim's uncle's intervention.
Web Summary : सांगली में, एक विवाद में मध्यस्थता करने पर 32 वर्षीय व्यक्ति की चाकू मारकर हत्या कर दी गई। पुलिस ने दो संदिग्धों को गिरफ्तार किया और एक नाबालिग को हिरासत में लिया। यह घटना घूरने को लेकर हुई बहस से शुरू हुई, जो पीड़ित के चाचा के हस्तक्षेप के बावजूद घातक हमले में बदल गई।