शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

माळेवाडी येथील परिस्थिती नियंत्रणात

By admin | Updated: May 1, 2015 00:15 IST

महाप्रसादातून ३५ जणांना विषबाधा : वैद्यकीय पथक तळ ठोकून

कोकरूड : कोकरूड (ता. शिराळा) जवळच्या माळेवाडी येथे मंगळवारी रात्री रेणुका देवीचा महाप्रसाद खाल्ल्यामुळे ३४ जणांना विषबाधा झाली होती. या घटनेने कोकरूड परिसरात गेल्या दोन दिवसांपासून खळबळ उडाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून, गुरुवारी यामध्ये एका रुग्णाची भर पडली आहे. दरम्यान, कोकरूड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक माळेवाडी येथे तळ ठोकून परिस्थितीतवर लक्ष ठेवून आहे. रुग्णालयातील इतर सर्व १६ रुग्णांना बुधवारी सायंकाळी उपचार झाल्यावर घरी सोडण्यात आले आहे. या गावातील रुग्णांना सलग तीन दिवस आवश्यक सलाईन व गोळ्या देण्यात येणार आहेत. गावातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती कोकरूड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. के. पाटील यांनी दिली. आरती संभाजी जाधव (वय २०) ही महिला मंगळवारी दाखल झाली होती. ती गुरुवारी सकाळी उलट्या सुरू झाल्याने उपचारासाठी पुन्हा कोकरूड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गांभीर्याने या घटनेत लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.मंगळवारी रात्री अकरा वाजता सुरू झालेली रुग्णांची गर्दी बुधवारी पहाटे चारपर्यंत होती. ३४ रुग्णांपैकी १७ रुग्णांना शिराळा व सांगली येथील शासकीय रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले. त्यात पाच बालकांचा समावेश आहे. कागदोपत्री ३४ रुग्ण असले तरी, दीडशेच्या आसपास विषबाधा झाल्याचा अंदाज असल्याचे वैद्यकीय अधिकारी अजय कांबळे यांनी सांगितले. डॉ. एन. के. पाटील, डॉ. नरेंद्र घड्याळे, आर. बी. ठोंबरे, डी. आर. ढवळे, एस. बी. भोसले, एस. एस. देसाई, व्ही. बी. मराठे आदींनी रुग्णांवर उपचार केले. पाणी व अन्नाचे नमुने मिरजेच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले आहेत, असे रुग्णालयातून सांगण्यात आले. लवकरच त्यासंदर्भात अहवाल मिळणार आहे. तो मिळाल्यानंतर विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)उलट्या, जुलाबाचा त्रासमहाप्रसादात भात, शिरा, आमटी, घुगऱ्या व अंबील यांचा समावेश होता. मंगळवारी सायंकाळी आठच्या दरम्यान महाप्रदासाचे वाटप करण्यात आले. तो कार्यक्रम रात्री दहापर्यंत सुरू होता. सुमारे २५० ते ३०० जणांनी प्रसाद खाल्ला. त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास जवळजवळ सर्वांनाच उलट्या व जुलाब सुरू झाले.बुधवारी सकाळी कॉँग्रेस प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख, विकास नांगरे आदींनी रुग्णालयाला भेट देऊन रूग्णांना औषध उपचारासाठी मदत केली.गुरुवारी सकाळी यशवंत युवक संघटनेचे अध्यक्ष सत्यजित नाईक, उपाध्यक्ष संजय घोडे, संचालक गजानन पाटील, तानाजी घोडे यांनी आरोग्य केंद्रास भेट देऊन अधिकाऱ्यांशी या संघटनेसंदर्भात चर्चा केली.