शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
2
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
3
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
4
विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
5
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
6
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
7
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
8
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनेल का विजय थलपती?
9
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
10
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
11
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
12
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
13
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
14
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
15
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
16
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
17
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
18
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
19
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
20
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांविरुद्ध फौजदारी

By admin | Updated: November 27, 2014 23:53 IST

गॅस्ट्रो प्रकरण : जिल्हा सुधार समितीची न्यायालयात धाव

मिरज : मिरजेत गॅस्ट्रोच्या साथीने नऊजणांचा बळी गेल्याबद्दल महापालिका आयुक्तांवर जिल्हा सुधार समितीने न्यायालयात फौजदारी दाखल केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. पाटील यांनी याप्रकरणी दि. ९ रोजी आयुक्तांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
मिरज शहरात गेल्या आठ दिवसांपासून दूषित पाणीपुरवठ्यामुळे गॅस्ट्रोच्या साथीचे थैमान सुरु आहे. अतिसारामुळे नऊ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. या प्रकाराला केवळ महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करून जिल्हा सुधार समितीचे प्रा. आर. बी. शिंदे व धनंजय भिसे यांनी अ‍ॅड. अमित शिंदे, अ‍ॅड. बशीर मुलाणी, अ‍ॅड. मंजुनाथ पाटील यांच्यामार्फत आयुक्त अजिज कारचे यांच्याविरूध्द मिरज न्यायालयात फौजदारी दाखल करून, आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महापालिका प्रशासनाने महापालिका क्षेत्रातील नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. मात्र महापालिका क्षेत्रात अस्वच्छ पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने गॅस्ट्रोची साथ पसरलेली आहे.
मिरजेतील जलवाहिनी १९५० मध्ये बसवली आहे. या जलवाहिन्यांची मुदत १९९० मध्ये संपली आहे. मात्र त्यानंतरही या जीर्ण झालेल्या जलवाहिन्या पाणीपुरवठ्यासाठी वापरात आहेत. सांडपाणी वाहिन्यांची मुदत १९९९ मध्ये संपली आहे. यामुळे आरोग्यास धोकादायक असलेले सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळून शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया न करता हे पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
या दाव्याप्रकरणी ९ डिसेंबर रोेजी आयुक्तांनी हजर राहून म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (वार्ताहर)


नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत
महापालिकेच्या या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांच्या झालेल्या मृत्यूला महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप सुधार समितीने केला आहे. महापालिकेच्या कारभारास आयुक्त अजिज कारचे हे जबाबदार असल्याने त्यांच्यावर फौजदारी दाखल करून, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.