शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

श्वानांवरील कर आकारणी रद्द : सांगली महापालिकेत काँग्रेसची पक्षबैठक -आज शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 11:34 PM

सांगली : महापालिका क्षेत्रातील पाळीव श्वानांना वार्षिक पाच हजार रुपये कर आकारण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव सत्ताधारी काँग्रेसने फेटाळून लावला. गुरुवारी झालेल्या पक्षबैठकीत कर आकारणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात

ठळक मुद्देबचत गटाच्या जागेला विरोध

सांगली : महापालिका क्षेत्रातील पाळीव श्वानांना वार्षिक पाच हजार रुपये कर आकारण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव सत्ताधारी काँग्रेसने फेटाळून लावला. गुरुवारी झालेल्या पक्षबैठकीत कर आकारणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापौर हारूण शिकलगार व गटनेते किशोर जामदार यांनी सांगितले. बचत गटाला जागा देण्यासही सत्ताधाऱ्यांनी विरोध केला आहे.महापालिकेची सभा शुक्रवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक गटनेते किशोर जामदार यांनी घेतली. बैठकीला महापौर हारूण शिकलगार यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील पाळीव श्वानांना वार्षिक पाच हजार रुपये कर आकारण्याचा प्रस्ताव शुक्रवारच्या महासभेत आला आहे. यामुळे श्वानप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. गुरूवारी श्वानप्रेमी व श्वानमालकांनी नगरसेवक शेखर माने यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर श्वानांसह मोर्चा काढला. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांची भेट घेऊन अन्यायी कर रद्द करण्याची मागणी केली होती. हा प्रस्ताव रद्द न झाल्यास सभेत श्वान सोडण्याचा इशाराही माने यांनी दिला होता. त्याचे पडसाद काँग्रेस बैठकीत उमटले.निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे असले कर प्रशासनाने सुचवू नयेत. पाचशे रुपये कराचा प्रस्ताव आरोग्य विभागाचा होता. मग आयुक्तांनी पाच हजार कर का केला? असा सवाल काही नगरसेवकांनी केला. श्वान मालकांकडून कोणताही कर घेऊ नये, अशी भूमिका सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतली. त्यानुसार हा विषय शुक्रवारच्या महासभेत रद्द करण्याचा निर्णय सत्ताधाºयांनी घेतला. महापालिका क्षेत्रातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालास प्रदर्शन व विक्री करण्यासाठी राजवाडा चौकातील शाळा नंबर दहाची खुली जागा देण्याचा विषय सभेत आला आहे. भविष्यात शाळेचा पट वाढल्यास सध्याची जागा अपुरी पडण्याची शक्यता असल्याने शाळेने ही जागा देण्यास विरोध केला आहे. त्यामुळे हा विषय रद्द करण्यात येणार आहे.सांगलीवाडी येथील श्री संत सेवा वारकरी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांना वार्षिक २ लाख ७२ हजार किंवा मासिक २२ हजार ७२० रुपये भाडेपट्ट्याने नऊ वर्षे मुदतीने जागा देण्याचा विषय सभेत आहे. वारकरी प्रतिष्ठान असल्याने वार्षिक केवळ पन्नास हजार वार्षिक भाडे आकारण्याचा निर्णय सत्ताधाºयांनी घेतला. त्यावर महासभेत चर्चा करून विषय मंजूर करण्यात येणार आहे. अग्निशमन केंद्राजवळील खुल्या जागेवर व्यायामशाळा बांधण्यासाठी कमी भाडेपट्टीने जागा देण्यासही बैठकीत सहमती दर्शविण्यात आली.राष्ट्रवादीचाही विरोधमहापालिका क्षेत्रातील पाळीव कुत्र्यांवर कर आकारणीस राष्ट्रवादी काँग्रेसनेही विरोध केला आहे. राष्ट्रवादीच्या पक्षबैठकीत नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध केला. शाळा नंबर दहाजवळील जागा बचत गटाला देण्यावर सभेत चर्चा करण्याची तयारी दर्शविण्यात आली.सांगली शहर व विस्तारित परिसरातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला विक्रीसाठी जागा व बाजारपेठ उपलब्ध नसल्याने त्यांच्या मालाची विक्री होत नाही. महासभेत राजवाडा चौकातील शाळेच्या जागेत कायमस्वरूपी सुमारे ५० स्टॉल बसतील, अशा जागेचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला आहे. बचत गटांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी जागेचा प्रश्न कायमचा सुटून मालाला योग्य भाव मिळेल.- शेखर माने, नेते, उपमहापौर गट

टॅग्स :Sangliसांगलीdogकुत्रा