विभागीय स्पर्धेसाठी बुडो मार्शल संघ जाहीर

By Admin | Updated: August 11, 2015 23:05 IST2015-08-11T23:05:05+5:302015-08-11T23:05:05+5:30

थाय बॉक्सिंगचा सांगली जिल्हा संघ जाहीर

Bundo Marshal team for Divisional tournament announced | विभागीय स्पर्धेसाठी बुडो मार्शल संघ जाहीर

विभागीय स्पर्धेसाठी बुडो मार्शल संघ जाहीर

सांगली : सातारा येथे होणाऱ्या विभागीय बुडो मार्शल आर्ट स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर झाला आहे. बुडो मार्शल संघटनेचे सरचिटणीस अधिक पाटील यांनी जिल्हा संघाची घोषणा केली. बुडो मार्शल आर्ट असोसिएशन व मित्रप्रेम स्पोर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने बोरगाव (ता. वाळवा) येथे जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडल्या.
स्पर्धेचे उद्घाटन सरपंच प्रकाश वाटेगावकर व उपसरपंच उमेश पाटील यांच्याहस्ते झाले. निवडलेला संघ असा : १४ वर्षे मुले : अविनाश शिंदे, सुमित कुंभार, शुभम दळवी. १४ वर्षे मुली : शर्मिला कांबळे, साक्षी ढगे, साक्षी महालिंग सलगर. १७ वर्षे मुले : सुनील हाके, प्रतीक पाटील, सुमित पाटील. मुली : रूपाली पाटील, कलावती पाटील, आरती पाटील. १९ वर्षे मुले : संतोष रूपकर, सतीश पाटील, सचिन कोळी.

थाय बॉक्सिंगचा सांगली जिल्हा संघ जाहीर
सांगली : जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत कौशल्यपूर्ण लढती झाल्या. या स्पर्धेतून सातारा येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर करण्यात आला. थाय बॉक्सिंग संघटनेचे सरचिटणीस अधिक पाटील यांनी जिल्हा संघाची घोषणा केली.
बांबवडे (ता. पलूस) येथील गुरूकुल अ‍ॅकॅडमीत या स्पर्धा पार पडल्या. अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष जितेंद्र संकपाळ व सुधीर आदाटे यांच्याहस्ते उद्घाटन झाले. नामदेव शिंदे व अधिक पाटील यांनी संयोजन केले.
निवडण्यात आलेला जिल्हा संघ असा : ९ वर्षे मुले : अजय करळे, पार्श्व शहा, साहील फार्णे, शौनक मिठारी. ९ वर्षे मुली : समीक्षा पवार, सानिका नाईक, संचिता पोतदार. १४ वर्षे मुले : पवन पाटील, सोमनाथ शिंदे, प्रणव कांबळे, शुभम दळवी, अजिंक्य सावंत, निरंजन सुतार. १४ वर्षे मुली : गायत्री राडे, मयुरी मगदूम, कावेरी वालीकर. १७ वर्षे मुले : सुमित पाटील, राहुल साळुंखे, महेश्वर पवार, अजय येवले, सुरेश पाटील. १७ वर्षे मुली : स्नेहा पाटील, रूपाली पाटील, हर्षदा मगदूम, प्राजक्ता झंवर. १९ वर्षे मुले : शंकर कोळेकर, कृष्णा मिठारी, शुभम मोहिते.

Web Title: Bundo Marshal team for Divisional tournament announced