शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांनी अन्याय केल्यानेच भाजपला रामराम, शिवाजीराव नाईकांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 17:26 IST

आपल्याबरोबर शिराळा तालुक्यातील ४८ हजार पक्ष सदस्यांनी भाजपचा राजीनामा दिला. इतक्या मोठ्या प्रमाणावर पक्षाचे सदस्य सामुदायिक राजीनामा देत असतील, तर ही गोष्ट पक्षाला विचार करायला लावणारी.

शिराळा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील संबंध टिकवण्यासाठी राजकीय खेळी करून हेतुपुरस्सर आमच्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य, प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ४८ हजार कार्यकर्त्यांनी भाजपच्या सर्व पदांचे व पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. शनिवारी (दि.२) राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिराळा येथे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी दिली.येथील यशवंत ग्लुकोज कारखान्याच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुका भाजपचे अध्यक्ष सुखदेव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, सागर नाईक, उत्तम पाटील, पांडुरंग गायकवाड, विजय महाडिक, शरद गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.नाईक म्हणाले की, २०१४ पासून आपण भाजपची पक्षबांधणी केली. शिराळा तालुक्याचा उत्तर भाग, मेणी खोरे, वाळवा तालुक्याचा पश्चिम भाग येथील शेती पाण्यासाठी वाकुर्डे बुदुक योजना, डावा कालवा यासाठी निधी द्यावा यासाठी तसेच आमच्या संस्था अडचणीत आल्या. याबाबत आम्ही सतत सहकार्य करावे, अशी मागणी करत होतो; मात्र आम्हाला भाजपने फक्त खेळवत ठेवले.ते म्हणाले की, आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक यांनी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर पालकमंत्री जयंत पाटील यांनी वाकुर्डे सिंचन योजना व डाव्या कालव्यासाठी आवश्यक निधी दिला आहे. त्यामुळे येथील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. संस्था सुरू होणार असल्याने स्थानिक नागरिकांना रोजगार मिळणार आहे. चांदोली पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

४८ हजार सदस्यांचा सामुदायिक राजीनामा

शिवाजीराव नाईक यांनी सांगितले की, आपल्याबरोबर शिराळा तालुक्यातील ४८ हजार पक्ष सदस्यांनी भाजपचा राजीनामा दिला. इतक्या मोठ्या प्रमाणावर पक्षाचे सदस्य सामुदायिक राजीनामा देत असतील, तर ही गोष्ट पक्षाला विचार करायला लावणारी आहे. हेतुपुरस्सर आमच्यावर गेल्या काही वर्षात अन्याय करण्यात आल्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलShivajirao Naikशिवाजीराव नाईक