Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 14:14 IST

LPG Petrol Diesel Price: इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'ची नाकेबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून इराणनंही अमेरिकेला धमकी दिली आहे.

LPG Petrol Diesel Price: इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'ची नाकेबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून इराणनंही अमेरिकेला धमकी दिली आहे. भारत मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल आणि गॅसची आयात करतो, विशेषतः एलपीजी प्रामुख्याने खाडी देशांतून मागवला जातो. ही नाकेबंदी वाढल्यास भारतासाठी आव्हानं वाढतील आणि केंद्र सरकारवर आर्थिक दबाव निर्माण होईल.

एलपीजी सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ

१ एप्रिल रोजी व्यावसायिक (Commercial) एलपीजी सिलिंडरच्या दरात १९५ ते २१८ रुपयांची वाढ करण्यात आली होती, ज्यामुळे दिल्लीत हा दर २०७८.५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तसंच ५ किलोच्या लहान सिलिंडरच्या किमतीत ५१ रुपयांची वाढ झाली होती. ७ मार्च रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरातही वाढ झाली होती, तेव्हा दिल्लीत ६० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली होती.

कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची स्थिती

युद्धापूर्वी कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ७० डॉलरच्या जवळ होता, जो आता १०० डॉलरच्या जवळ पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे तेल विपणन कंपन्यांवर दबाव वाढला आहे. सरकारनं यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात १०-१० रुपयांची कपात करून दिलासा दिला होता, मात्र 'नायरा' आणि 'शेल इंडिया' या कंपन्यांनी आधीच किमती वाढवल्या आहेत. आता सरकारी कंपन्या हा बोजा किती काळ सहन करतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

चर्चेची दुसरी फेरी आणि अपेक्षा

पहिल्या फेरीतील अपयशानंतर अमेरिका आणि इराण यांच्यात १६ एप्रिल रोजी दुसऱ्या फेरीची चर्चा होण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार, दोन्ही देश पुन्हा चर्चेसाठी सहमत झालेत, मात्र या बैठकीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता आलेली नाही. जर हा तणाव निवळला नाही, तर आगामी काळात इंधन दरात मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : US-Iran tensions may hike fuel prices; India faces major impact.

Web Summary : US-Iran conflict threatens India's fuel imports, potentially raising petrol, diesel, and LPG prices. Rising crude oil costs add pressure. Future talks offer hope, but further price hikes loom if tensions persist.
टॅग्स :अमेरिका-इस्रायल-इराण वॉरखनिज तेलपेट्रोलडिझेलदर वाढ