शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

भाष्टेवाडी, कोकणेवाडी दुर्घटनेच्या छायेखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरातील आरळापैकी भाष्टेवस्ती तसेच कोकणेवाडी वस्ती माळीणसारख्या दुर्घटनेच्या छायेखाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरातील आरळापैकी भाष्टेवस्ती तसेच कोकणेवाडी वस्ती माळीणसारख्या दुर्घटनेच्या छायेखाली वावरत आहेत. वाडीलगत भेगा पडून डोंगर खचू लागले आहेत. याची भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने पाहणी करून कोकणेवाडीचा डोंगर ढासळू शकतो, असा निष्कर्ष काढला होता. याबाबत वरिष्ठ कार्यालयास ११ नोव्हेंबर २०१९ ला कळवूनही यावर ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.

ऑगस्ट २०१९ मध्ये तहसीलदार गणेश शिंदे यांनी खचलेल्या डोंगराची पाहणी केली होती. त्यांनी तातडीने भूवैज्ञानिकांना बोलावले होते. तहसीलदार शिंदे, वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर धोटे, कनिष्ठ भूवैज्ञानिक जयंत मिसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांनी पाहणी केली होती. धोटे व मिसाळ यांनी भूस्तर भाग, भौगोलिक परिस्थिती, खडकाची रचना, पाण्याचा निचरा याची चार तास तपासणी केली. कोकणेवाडी डोंगर लालमातीने भरला आहे, दगडाची झीज झाली आहे. मुरूम मातीची धूप झाली आहे. हा थर १० ते २० फूट खोल आहे. तो कठीण दगडापासून सुटलेला आहे. ओढ्यामुळे या डोंगराची झीज वेगाने होत आहे. पाण्यामुळे माती व मुरूम वाहून जात आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाली की हा डोंगराचा भाग केव्हाही सुटू शकतो. हा भाग सुटल्यास डोंगरपायथ्याशी असलेल्या चार घरांना व शाळेस मोठा धोका आहे. भाष्टे वस्तीला डोंगरास पडलेल्या भेगांमुळे धोका नाही, मात्र, ही वस्ती दोन ओढ्यांमध्ये असल्याने पाणी पातळी वाढल्यास संपर्क तुटू शकतो, असा निष्कर्ष भूवैज्ञानिकांनी काढला होता.

भाष्टेवस्ती येथे दोन ओढ्यामध्ये सहा घरांतील ४३ व कोकणेवाडी येथील १२ घरांतील ७८ अशा १२१ नागरिकांचे स्थलांतर होणे आवश्यक आहे. या कुटुंबाचे कायमस्वरूपी स्थलांतर करणे आवश्यक आहे.

कोट या कुटुंबांचे स्थलांतर करण्याच्यादृष्टीने सर्व पाहणी करण्यात आली असून याबाबत अहवाल तयार करून वरिष्ठ कार्यालयास पाठवला आहे. कुटुंबांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.

गणेश शिंदे, तहसीलदार, शिराळा