शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीग्रस्त भरपाईच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 11, 2015 00:27 IST

जत तालुक्यात चार हजार लाभार्थी वंचित : एक कोटीचा प्रस्ताव लाल फितीत

संख : मार्चमध्ये अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीच्या प्रतीक्षेत जत तालुक्यातील ४ हजार २३९ शेतकरी गेल्या तीन महिन्यांपासून आहेत. रब्बीच्या ज्वारी, गहू, हरभरा पिकासह द्राक्षे, फळबागांचेही नुकसान झाले होते. तालुक्यातील २ हजार १७३.५० हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. प्रशासनाने १ कोटी ५ लाख ८० हजार रुपये मदतीचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविला आहे. धक्कादायक बाब म्हणजे द्राक्षांचे नुकसान प्रशासनाच्या कागदावर अजिबातच झालेले नाही.तालुक्यामध्ये २८ फेबु्रवारी व एक मार्च असे सलग दोन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर दोन-तीन दिवसांच्या अंतराने १५ मार्चपर्यंत अवकाळीने तडाखा दिला. रब्बी हंगामातील पिकांची काढणी व द्राक्ष हंगामाच्या काळातच पावसाने हजेरी लावल्याने ज्वारी, हरभरा, गहू, खपली, मका या पिकांसह द्राक्षे व बेदाण्याचे मोठे नुकसान झाले होते. द्राक्षमण्यांना तडे गेले. ज्वारी, गहू, रानात भिजला. ज्वारी काळी पडली. निर्यातक्षम द्राक्षांचे मोठे नुकसान झाले. शेडवरील बेदाणा भिजून काळा पडला. उतारा कमी निघाला. जिल्हा प्रशासनाने कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवकांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यांनी पंचनामे वस्तुनिष्ठपणे केलेले नाहीत. जास्त नुकसान होऊनही ५० टक्केपेक्षा कमी नुकसान दाखविण्यात आले आहे.पंचनाम्यानुसार ४ हजार २३९ शेतकऱ्यांचे २ हजार १७३.५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामध्ये ज्वारीचे १ हजार ८५६ हेक्टर, गहू ११८.८७ हेक्टर, हरभरा १६३.३५ हेक्टर, द्राक्षे - ०० हेक्टर, तर बेदाण्याचे ९८५.५० टनाचे नुकसान झाल्याचे नमूद आहे. पंचनाम्यातून बेदाणा उत्पादक शेतकऱ्याला वगळले आहे. सर्वाधिक नुकसान होऊनही फक्त ९८५.५० टन बेदाण्याचे नुकसान दाखविण्यात आले आहे. हजारो टन बेदाणा रॅकवर भिजला आहे. तीन हजार टन बेदाणा काळा पडला आहे. त्याची गुणवत्ता कमी झाली आहे. बेदाणाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनसुद्धा पंचनाम्यामध्ये ५० टक्केपेक्षा कमी नुकसान दाखविण्यात आले आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागले. द्राक्षांचे नुकसान बेदखल...