शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिका सभापतीपदी अतुल माने, गीता पवार, माया गडदे यांची बिनविरोध निवड; अधिकृत घोषणा शुक्रवारी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 17:30 IST

पहिल्यांदा नगरसेवक ते थेट सभापती

सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अतुल माने, समाजकल्याण सभापती गीता पवार तर प्रभाग समिती तीनच्या सभापतीपदी माया गडदे यांची बिनविरोध निवड झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. याबाबतची अधिकृत घोषणा शुक्रवारी होणार आहे.

स्थायीसह विषय समितीच्या सभापतीपदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदत होती. या कालावधीत तीन सभापतीपदाची निवड बिनविरोध झाली. तर चार सभापतीपदासाठी शुक्रवारी निवडणूक होत आहे. सातपैकी सहा सभापतीपदे भाजपकडे तर एक सभापतीपद राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडे जाणार आहे.

महापालिकेच्या स्थायी समिती, महिला बालकल्याण, समाजकल्याण व चार प्रभाग समिती सभापतीपदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल झाले. सकाळी भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) व विरोधी काँग्रेसच्या गटनेत्यांनी नगरसेवकांची बैठक बोलाविली होती.

भाजपकडून स्थायी समिती सभापतीपदासाठी अतुल माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर महिला बालकल्याण सभापतीपदासाठी बानू जमादार, समाजकल्याण सभापतीपदासाठी गीता सूरज पवार, प्रभाग एक सभापतीपदासाठी रईसा शिकलगार, दोनसाठी वैशाली राजू गवळी, तीनसाठी माया गडदे यांची नावे निश्चित करण्यात आली. तर प्रभाग समिती चार राष्ट्रवादीला सोडण्यात आली. तेथून राष्ट्रवादीच्या अश्विनी कोळी यांना उमेदवारी देण्यात आली. भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी महापौर धीरज सूर्यवंशी, भाजपचे नेते सुरेश आवटी, उपमहापौर गजानन मगदूम, गटनेते संदीप आवटी यांच्या उपस्थितीत नगरसचिवांकडे अर्ज दाखल केले.

दुसरीकडे विरोधी काँग्रेस नगरसेवकांची बैठक गटनेते मंगेश चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक राजेश नाईक यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यावरून बरीच खलबते झाले. भाजपच्या अतुल माने, रोहिणी पाटील, संदीप आवटी यांनी विरोधी पक्षनेते चव्हाण यांची भेट घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. त्यावर बंद खोलीत चर्चा झाली.

अखेर काँग्रेसने तीन प्रभाग समिती व महिला बालकल्याण समिती सभापतीपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महिला बालकल्याण समितीसाठी अंजली जाधव, प्रभाग एकसाठी अश्विनी कोळेकर, दोनसाठी सोनल पाटील सावर्डेकर व प्रभाग चारसाठी ॲड. बिलकिस बुजरूक यांचे अर्ज दाखल करण्यात आले.

अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत स्थायी समिती, समाजकल्याण व प्रभाग तीन सभापतीपदासाठी केवळ एकच अर्ज आल्याने या तीन जागा बिनविरोध झाल्या. त्याची अधिकृत घोषणा शुक्रवार १३ रोजी आयोजित विशेष सभेत होणार आहे. तर उर्वरित सभापतीसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.

सभापतीपदावर महिलाराज

महापालिकेच्या सात विषय समिती सभापतीपदासाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात स्थायी समिती वगळता उर्वरित सहाही सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) गट व विरोधी काँग्रेसने महिलांना संधी दिली आहे. विषय समितीमधील संख्याबळ पाहता सत्ताधारी गटाचेच सभापतीपदावर वर्चस्व राहणार आहे.

पहिल्यांदा नगरसेवक ते थेट सभापती

महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्यांना थेट सभापतीपदाची लाॅटरी लागली आहे. भाजपचे अतुल माने, बानू जमादार, गीता पवार, रईसा शिकलगार, वैशाली गवळी, माया गडदे तर राष्ट्रवादीच्या अश्विनी कोळी हे सातजणही प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. आता त्यांना सभापतीपदाची संधी मिळाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Atul Mane, Geeta Pawar, Maya Gadde Elected Sangli Corporation Chairpersons Unopposed

Web Summary : Atul Mane, Geeta Pawar, and Maya Gadde were elected unopposed as chairpersons in Sangli Municipal Corporation. Elections for four other positions are scheduled. BJP secured six positions, while NCP (Ajit Pawar) got one. Women dominate the chairperson roles, with many new corporators getting opportunities.