शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरज सिव्हिलमध्ये खून प्रकरणातील आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 17:35 IST

एक जण ताब्यात, रिव्हॉल्वर व कोयता जप्त; तिघे फरार

मिरज : मिरजेत खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण याच्यावर बुधवारी मिरज सिव्हिलमध्ये खुनी हल्ल्याचा प्रयत्न झाला. यावेळी पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी एका हल्लेखोराला ताब्यात घेत रिव्हॉल्वर व कोयता जप्त केला. त्याचे तीन साथीदार फरार झाले आहेत. या घटनेमुळे मिरज सिव्हिलमध्ये खळबळ उडाली. मिरजेतील निखिल कलगुटगी खून प्रकरणी शहर पोलिसांच्या कोठडीत असलेले आरोपी सलीम पठाण, चेतन कलगुटगी, विशाल शिरोळे, सोहेल तांबोळी यांना वैद्यकीय तपासणीसाठी बुधवारी दुपारी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. त्यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, हवालदार राजेश गवळी, प्रवीण वाघमोडे व सचिन सनदी हे पोलीस पथक होते. सलीम पठाण याची वैद्यकीय तपासणी सुरू असताना वंश वाली हा संशयित गुन्हेगार बाहेर थांबला असल्याचे हवालदार राजेश गवळी यांना दिसले. हवालदार गवळी यांनी तत्परतेने त्यास पकडून झडती घेतली असता त्याच्याकडे परदेशी बनावटीचे पूर्ण लोडेड रिव्हॉल्वर सापडले. वाली याची पोलिसांशी झटापट सुरु असताना त्याच्यासोबत आलेले अन्य तीन साथीदार तेथे कोयता टाकून पसार झाले. या प्रकारामुळे सिव्हिल परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. सलीम पठाण याच्याशी वैर असल्याने त्याच्यावर रिव्हॉल्वर व कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्याचा वंश वाली व त्याच्या साथीदारांचा कट होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव उधळला गेला. या घटनेमुळे सिव्हिल परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. पळून गेलेल्या आरोपींच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, निरीक्षक किरण चौगुले व सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांनी भेट देऊन या घटनेची माहिती घेतली. याप्रकरणी हवालदार राजेश गवळी यांनी गांधी चौक पोलिसात फिर्याद दिली असून वंश वाली व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलीम याचा गेम करण्यासाठी आला

मिरजेत कमान वेस परिसरात फेब्रुवारी महिन्यात कुणाल वाली या तरुणाचा खून करण्यात आला होता. कुणाल याची टीप सलीम पठाण याने दिल्याच्या संशयाने कुणाल याचा भाऊ वंश वाली याने त्याचा काटा काढण्याचे ठरविले होते. त्यानुसार तो सौरभ पोतदार, वैभव आवळे व अन्य एकास सोबत घेऊन सिव्हिलमध्ये सलीम याचा गेम करण्यासाठी आला होता अशी माहिती मिळाली. वंश वाली, सौरभ पोतदार, वैभव आवळे हे सर्वजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Murder accused attacked in Miraj Civil Hospital, attempt foiled.

Web Summary : An attempt to attack Salim Pathan, accused in a murder case, at Miraj Civil Hospital was foiled by police. One attacker was arrested with a revolver and sickle. Three accomplices fled. The incident caused a stir.