शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २५ हजार बांधकाम कामगारांना मदत; अडीच हजार अर्जांमध्ये त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:25 IST

सांगली : लॉकडाऊनमध्ये रोजगार हिरावल्याने राज्य शासनाने बांधकाम कामगारांना दोन टप्प्यांत पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. सांगली ...

सांगली : लॉकडाऊनमध्ये रोजगार हिरावल्याने राज्य शासनाने बांधकाम कामगारांना दोन टप्प्यांत पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. सांगली जिल्ह्यात सध्या ८० हजार नोंदणीकृत कामगार असून आजअखेर २५ हजार १८९ कामगारांना मदत मिळाली आहे. अडीच हजार अर्जांत त्रुटी आढळल्याने त्या दूर करून पुन्हा प्रस्ताव पाठविण्यात येत आहेत.

नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना पहिल्या टप्प्यात दोन हजार व दुसऱ्या टप्प्यात ३ हजार रुपये एवढे आर्थिक साहाय्य थेट बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात डीबीटी पद्धतीने जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील नोंदीत सक्रिय २५ हजार १८९ बांधकाम कामगारांना मदत देण्यात आली आहे. अजूनही ही प्रक्रिया सुरू आहे. अडीच हजार कामगारांच्या अर्जात त्रुटी आढळल्या होत्या, त्या दुरुस्त करण्याचे काम सध्या सुरू आहे. बांधकाम कामगारांना या योजनेतून दिलासा मिळाला आहे. सक्रिय व हयात कामगारांना याचा लाभ देण्यात येत आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन असून तांत्रिक अडचणी नसल्याने हे प्रस्ताव गतीने मंजूर होत आहेत.

आकडेवारी

जिल्ह्यातील एकूण बांधकाम कामगारांची संख्या

८०,०००

लाभ मिळालेल्या एकूण कामगारांची संख्या

२५,१८९

त्रुटी असल्याने लाभाच्या प्रतीक्षेत असलेले कामगार

२,५००

अर्जांमध्ये काय त्रुटी आहेत

अनेक कामगारांनी हयातीचे दाखले जोडलेले नाहीत.

अनेकांच्या आधार कार्डची माहिती नाही

बँक खाते क्रमांकाबाबत माहिती व्यवस्थित नाही

काही ठिकाणी वेगवेगळ्या कागदपत्रांमध्ये नावामध्ये फरक दिसून येतो. त्याची दुरुस्ती झाली नाही

कोट

बांधकाम कामगारांना कोरोना काळातील मदत तातडीने मिळत आहे. प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असून खऱ्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

-अनिल गुरव, सहायक कामगार आयुक्त, सांगली

कोट

शासनाने जाहीर केल्याप्रमाणे आम्हाला मदतनिधी मिळाला. लाॅकडाऊनमुळे रोजगार ठप्प होता. गरिबीचे चटके सोसत असताना मिळालेली ही मदत दिलासा देणारी ठरली.

-चंद्रकांत इंगळे, बहादूरवाडी (ता. वाळवा)

कोट

अजूनही आम्ही कोरोनामुळे, महागाईमुळे अडचणीत आहोत. आर्थिक स्थिती चांगली नाही. अशा काळात शासनाने आम्हाला मदत दिली. त्याचा लाभ मिळाला.

- बाळासाहेब सुतार, वशी (ता. वाळवा)