शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
2
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
3
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
4
विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
5
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
6
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
7
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
8
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनेल का विजय थलपती?
9
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
10
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
11
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
12
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
13
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
14
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
15
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
16
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
17
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
18
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
19
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
20
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडी पोलिसांच्या कारभाराला चाप

By admin | Updated: March 17, 2015 00:10 IST

--लोकमतचा दणका

अविनाश बाड - आटपाडी  पोलिसांच्या भोंगळ कारभाराला आज (सोमवारी) जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्या विशेष पथकाने चाप लावला. तालुक्यात सुरु असलेला मटका आणि येथील पोलीस ठाण्यातील ‘कलेक्टरां’चा पर्दाफाश या पथकाने केला. पथकाने आज तालुकाभर छापे टाकले. खरसुंडीतील मटक्याच्या अड्ड्यावरून संशयितांसह तब्बल ५ हजार ४५२ रोख रक्कम जप्त केली. विशेष पथकामुळे आज दिवसभर पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी प्रथमच गणवेशात असल्याचे तालुकावासीयांनी पाहिले.‘लोकमत’ने आजच्या (सोमवार दि. १६ मार्च) अंकात आटपाडी पोलीस ठाण्यातील अजब कारभाराबद्दल सडेतोड वृत्त प्रसिध्द केले. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी या वृत्ताची गांभीर्याने दखल घेतली. त्याचे पडसाद आटपाडी पोलीस ठाण्यात दिवसभर दिसत होते.पोलीस ठाण्यातील फलकावर सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी गणवेशात हजर राहावे, अशी सूचना लिहिण्यात आली. यासोबत प्रभारी अधिकारी यांनी हजेरी घ्यावी, अशीही सूचना लिहिण्यात आली होती. गोपनीय विभागातील कर्मचारी वगळता आज सर्व कर्मचारी गणवेशात होते.जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाने दिवसभर अनेक ठिकाणी छापे टाकले; मात्र पथकाचा सुगावा लागल्याने अनेक ठिकाणी पथकाला यश मिळू शकले नाही, तर अवैध धंदेवाल्यांची आज दिवसभर पळता भुई थोडी झाली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास खरसुंडी येथील निकम वस्ती रस्त्यावरील कल्याण, मुंबई मटका घेताना तानाजी काशिनाथ निकम (वय ६५, रा. चिंचाळे) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पथकाने जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली. या मटका बुकीचा मालक मधुकर पाटोळे (रा. खरसुंडी) याच्याविरुध्द पथकातील कर्मचारी अरुण पाटील यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

साहेब पुढे बसले!
आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार हे आज दिवसभर गणवेशात जीपच्या पुढील ‘सीट’वर बसले होते. आटपाडी पोलिसांनीही आटपाडी आणि दिघंची परिसरात रस्त्यावर इतरांना बाधा येईल, अशा लावलेल्या चार वाहनांवर कारवाई केली.