शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना उपाययोजनांसाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:18 IST

सांगली : जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरी राज्यात वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे जिल्ह्यातही खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये ...

सांगली : जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरी राज्यात वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे जिल्ह्यातही खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये मंगल कार्यालयामध्ये तसेच इतर ठिकाणी कार्यक्रम सुरू असून मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी केली जात आहे. त्यामुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी व तपासणी करण्यासाठी शहरासह तालुका पातळीवर स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले की, कोरोना नियंत्रणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात पथके तयार करण्यात आली आहेत. मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेस, बाजार, मंडई, रेस्टॉरंट तसेच अन्य गर्दीच्या ठिकाणी मर्यादित लोकांची उपस्थिती, मास्क, सॅनिटायझर यांचा वापर, योग्य सामाजिक अंतर याबाबतची तपासणी या पथकाद्वारे होणार आहे.

पोलीस, जिल्हा परिषद प्रशासन व तालुका पातळीवर तहसीलदारांना याबाबतचे अधिकार देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.