शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अंधांच्या संगणक शिक्षणासाठी दानशुरांना साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:28 IST

सांगली : अंध तरुणांना संगणकाच्या माध्यमातून आधुनिक शिक्षणाची द्वारे खुली व्हावीत, यासाठी काही अंध लोकांनी मिळूनच मिरजेतील अंध, अपंग ...

सांगली : अंध तरुणांना संगणकाच्या माध्यमातून आधुनिक शिक्षणाची द्वारे खुली व्हावीत, यासाठी काही अंध लोकांनी मिळूनच मिरजेतील अंध, अपंग सेवा संस्थेच्या माध्यमातून एक उपक्रम हाती घेतला आहे. समाजातील दानशुरांनी त्यांच्याकडील विनावापर पडून असलेले चालू स्थितीतील संगणक दान करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अनेकांनी या उपक्रमास प्रतिसाद दिला आहे.

अंध, अपंग सेवाभावी संस्था ही अंधांच्या सर्वांगीण विकासाकरिता कार्य करीत आहे. अनेक उपक्रम संस्थेमार्फत राबविले जातात. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या अंध विद्यार्थ्यांनाकरिता संगणक प्रशिक्षण केंद्र उपलब्ध नसल्याने संस्थेने एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात अंध विद्यार्थ्यांना सोमवार ते शनिवार ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार असून, रविवारी त्यांना एकत्रित करून प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाईल‌. हे प्रशिक्षण विनामूल्य स्वरूपाचे आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने आहे. या प्रशिक्षणाकरिता मार्गदर्शक म्हणून स्वतः अंध असलेले पुणे अंध शाळेचे संगणक मार्गदर्शक तेजस बेंद्रे हे मार्गदर्शन करणार आहेत. या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येकाच्या घरी संगणक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याकरिता अनेक संगणकांची आवश्यकता असून, ज्यांच्याकडे वापरात नसलेले संगणक असतील त्यांनी ते संस्थेने आखलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमास देऊन अंधांच्या विकासकामी अनमोल सहकार्य करावे. या कार्यात मदतीचा हातभार लागल्याने अंध विद्यार्थ्यांच्या विकासात भर पडेल, असे आवाहन यशवंत जाधव यांनी केले आहे.

चौकट

दानशुरांना आवाहन

उपक्रमास लोकांनी प्रतिसाद देत काही संगणक दिले आहेत. मात्र, आणखी संगणकांची गरज लागणार आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे, अशा लोकांनी अंधांच्या या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.