शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

पानसरेंवरील हल्ला दहशतवादी कृत्य घोषित करा

By admin | Updated: May 1, 2015 00:16 IST

भालचंद्र कांगो : भूसंपादन कायद्याविरोधात १४ मे रोजी आंदोलन

सांगली : सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्यावर झालेला हल्ला शासनाने दहशतवादी कृत्य म्हणून घोषित करावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत केली. शासनाच्या भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध करण्याकरिता दि. १४ मे रोजी देशव्यापी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.डॉ. कांगो म्हणाले की, पानसरे यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी राज्य शासनाने दीडशे टीम तयार केल्या आहेत, परंतु तरीही मारेकऱ्यांना अटक करण्यात यश आलेले नाही. आता त्यांनी एसआयटीकडे तपास सोपवून तपासात अपयशी ठरल्याचीच कबुली दिली आहे. वास्तविक पानसरे आणि दाभोलकर यांच्या विचारांची भीती वाटणाऱ्या संघटनांनीच त्यांचा पध्दतशीरपणे खून केला आहे. शासनाने दोन्ही खुनांच्या घटना या दहशतवादी कृत्य असल्याचे मान्य करणे गरजेचे आहे.ते म्हणाले की, गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी काढून त्या उद्योगपतींच्या ताब्यात देण्याचा शासनाचा डाव आहे. शासन हे उद्योगपतींच्या लाभासाठी दलालाचे काम करीत आहे. भूमी अधिग्रहण कायदा करण्याचा अट्टाहास केंद्र शासन करीत आहे. त्याला सर्वच स्तरातून विरोध करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाकपतर्फे दि. १४ मे रोजी देशपातळीवर रास्ता रोको, धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)धार्मिक उन्मादासाठी गोहत्याबंदी समाजातील धार्मिक उन्माद वाढविण्यासाठीच शासनाने गोहत्या बंदी कायदा अंमलात आणला आहे. भाकड गाई सांभाळणे हे शेतकऱ्यांना शक्य नसल्याने उन्हाळ्यात भाकड गाई भाजप कार्यालयासमोर बांधून त्यांचा सांभाळ कार्यकर्त्यांनी करावा, असे आवाहन लवकरच करण्यात येणार असल्याचे डॉ. कांगो यांनी सांगितले.