शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

अंजलीला मिळाला मदतीचा हात!

By admin | Updated: April 1, 2015 00:00 IST

जपान दौऱ्यासाठी निवड : ‘लोकमत’च्या आवाहनाला प्रतिसाद

ऐतवडे बुद्रुक : ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील शेतमजुराची मुलगी अंजली आनंदा कोकरे हिने देशपातळीवरील इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड प्रदर्शनात सादर केलेल्या बहुउद्देशीय कृषी यंत्राला पश्चिम विभागात प्रथम क्रमांक मिळाला होता. त्यानंतर तिची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे सकुरा एक्स्चेंज प्रोग्रॅम आॅफ जपानच्या वैज्ञानिक दौऱ्यासाठी जिल्ह्यातून निवड करण्यात आली आहे. तिला मदतीची गरज आहे, याबाबत ‘लोकमत’ने ‘शेतमजुराची मुलगी चालली जपानला, अंजलीला हवाय दानशूरांच्या मदतीचा हात’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. हे वृत्त वाचून आजपर्यंत सुमारे १0 जणांनी ५९ हजार रुपयांची आर्थिक मदत अंजलीला केली आहे.अंजली कोकरे हिने बनविलेल्या बहुउद्देशीय कृषी यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला होता. इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड विजेत्यांची केंद्र सरकारच्यावतीने सकुरा एक्स्चेंज प्रोग्रॅमसाठी मे महिन्यात जपान दौऱ्यासाठी निवड केली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातून एकमेव अंजलीची निवड झाली आहे.अंजलीचे वडील शेतमजूर आहेत. तिला जपानला जाण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्या अनुषंगाने ‘लोकमत’ने मदतीचे आवाहन करण्यासाठी वृत्त प्रसिध्द केले होते. त्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
आजपर्यंत यशवंत युवक संघटना शिराळा यांनी २0 हजार, इस्लामपूर येथील उद्योजक सर्जेराव यादव यांनी १0 हजार, अरविंद आनंदराव कुलकर्णी सांगली ११ हजार रुपये, प्रशांत प्रल्हाद कोळेकर, दत्तात्रय आप्पा कोळेकर, डॉ. प्रकाश भीमराव कोळेकर (सर्व रा. किडेबिसरी, ता. सांगोल, जि. सोलापूर) यांनी प्रत्येकी ५ हजार रुपये, रज्जाक मुल्ला बावची यांनी २ हजार, कर्मवीर हायस्कूलचे शिक्षक बी. आर. पाटील ५०० रुपये, ईश्वर पाटील कोरेगाव ५०० रुपयांची आर्थिक मदत अंजलीला केली आहे. (वार्ताहर)

‘लोकमत’चे अभिनंदन
‘अंजली कोकरे हिला मदतीची गरज’ हे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द करताच अनेक दानशूरांनी मदतीचा हात पुढे केला. तसेच हे वृत्त प्रसिध्द केल्याबद्दल ‘लोकमत’चेही विशेष आभार मानले.