पोलिस क्रीडा स्पर्धेत अनिल ऐनापुरेचा विक्रम

By Admin | Updated: March 12, 2015 23:53 IST2015-03-12T21:56:11+5:302015-03-12T23:53:56+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप सावंत, शासकीय अ‍ॅथलेटिक प्रशिक्षक महेश पाटील व उत्तम मोटे यांचे अनिलला मार्गदर्शन लाभले.

Anil Anapurecha's record in police sports competition | पोलिस क्रीडा स्पर्धेत अनिल ऐनापुरेचा विक्रम

पोलिस क्रीडा स्पर्धेत अनिल ऐनापुरेचा विक्रम

सांगली : सांगलीचा आंतरराष्ट्रीय धावपटू अनिल अण्णासाहेब ऐनापुरे याने मुंबईत झालेल्या २७ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत नव्या विक्रमाची नोंद केली. अनिलने ४०० मीटर अडथळा प्रकारात स्वत:चाच ५४.८८ सेकंद हा विक्रम मोडीत काढत, ५३.८५ सेकंद या नव्या विक्रमाची नोंद केली. याच स्पर्धेतील २०० मीटर धावणे प्रकारात वेगवान खेळ करीत अनिलने रौप्यपदक मिळविले. तसेच ११० मीटर अडथळा स्पर्धेमध्ये सुवर्ण, तर ४०० मीटर रिलेमध्ये रौप्यपदक पटकावले. अनिलने यापूर्वी ल्युसिफोनिया गेममध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. २८ पेक्षा अधिक राज्य-राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये त्याने धक्कादायक निकालांची नोंद करीत पदके पटकावली आहेत. तो सध्या सांगली पोलीस दलात हवालदार पदावर सेवेत आहे. अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात अनिलची निवड झाली आहे. गृहराज्यमंत्री रणजित कांबळे यांच्याहस्ते अनिलला ‘उत्कृष्ट खेळाडू’चा बहुमान प्रदान करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप सावंत, शासकीय अ‍ॅथलेटिक प्रशिक्षक महेश पाटील व उत्तम मोटे यांचे अनिलला मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)

Web Title: Anil Anapurecha's record in police sports competition