शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आषाढ-श्रावणातील आनंदघन लुप्त

By admin | Updated: August 26, 2015 23:07 IST

निसर्गसंपन्न शिराळा तालुका कोरडाच : वारणा डावा कालवाही पाण्याविना

सहदेव खोत -पुनवत  सांगली जिल्ह्यातील पावसाचे आगर म्हणजे शिराळा तालुका. आषाढ, श्रावणात कधी तुफानी, तर कधी श्रावणसरींनी बरसणाऱ्या वरुणराजाने सध्या तालुक्याकडे पाठ फिरवली आहे. दिवसभर अधूनमधून कडक ऊन, तर कधी पावसाची रिमझिम आणि रात्री पाऊलवाटा स्पष्ट दिसाव्या असे लख्ख चांदणे... गेल्या महिन्याभरापासून निसर्गाचे असे विचित्र रूप पाहण्याचा योग तालुकावासीयांच्या वाट्याला आला आहे.शिराळा तालुका म्हणजे जिल्ह्यात निसर्गाचे वरदान लाभलेला तालुका. येथील डोंगर-दऱ्या, चांदोली धरण परिसर, वारणा नदीची ठिकठिकाणांहून दिसणारे विलोभनीय दृश्य अशा विविध गोष्टींमुळे तालुका जणू नजरेतच भरत असतो.पावसाळ्यात तर येथे दिसणारे मोहक दृश्य सर्वांनाच सुखावणारे असते. मात्र यंदाच्या पावसाळ्यात मात्र आषाढ - श्रावणातील आनंददायी रूप लुप्त झाल्याचे जाणवत आहे. फक्त चांदोली धरण परिसरात जेमतेम पाऊस असल्याने वारणेला समाधानकारक पाणी आहे. आषाढ संपला, श्रावण सरत चालला तरी पाऊसच झाला नाही. त्यातच पावसाची तरणा, म्हातारा ही नक्षत्रेही कोरडीच गेली आहेत.वारणा नदी सोडली तर ओढे, नाले, तलाव, तळी, कालवे यात समाधानकारक पाणी नाही. पावसाळ्यात तुडुंब असणारे पाण्याचे हे स्रोत कोरडेच आहेत. दिवसभर ऊन, अधूनमधून केव्हातरी फक्त रिमझिम व रात्री पाऊलवाटा स्पष्ट दिसाव्या असे लख्ख चांदणे असे विचित्र वातावरण तालुक्यात दिसत आहे. पावसाळ्यात तुडुंब असणारा वारणा डावा कालवा कोरडा ठप्प पडला आहे.तालुक्यात शेतीपिके कशीतरी तग धरून आहेत. विचित्र वातावरणामुळे नागरिकांना ताप, थंडी, सर्दी, खोकला आदी आजारांनीही पछाडलेले आहे. ऐन पावसाळ्यात पावसाचे आगरच पावसापासून वंचित असल्याने, नागरिक, पर्यावरणप्रेमी, पर्यटक, शेतकरी यांचा आनंद हरवला आहे. पर्जन्याचे ढग हटून चिंतचे ढग तालुक्यातील शेतकरी, नागरिकांच्या डोईवर आले आहेत. पाणपक्ष्यांचे स्थलांतर?तालुक्यात नदी, तलाव, कालवा यामध्ये समाधानकारक पाणी नसल्याने प्रतिवर्षी पावसाळ्यात पाण्याजवळ आढळणारे पाणकावळा (करढोक), खंड्या (किंगफिशर), काळे-पांढरे पाणबदक, लहान-मोठे बगळे, पाणकोंबड्या यासारखे पाणपक्षी नजरेस पडेनासे झाले आहेत. पाऊस नसल्याने त्यांनी स्थलांतर केल्याचे जाणवत आहे.