शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: महायुतीत गडबड, महाविकास आघाडीत पडझड

By अविनाश कोळी | Updated: May 17, 2025 19:35 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला अडथळ्यांची शर्यत

अविनाश कोळीसांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मैदान सज्जतेची तयारी सुरू असताना गोंधळलेल्या राजकीय भूमिकांच्या संभ्रमाचे ढग दाटले आहेत. महाविकास आघाडीत संघटनात्मक भिंतीची पडझड सुरू आहे, तर महायुतीत मित्रपक्षांमधील सूर बिघडले आहेत. त्यामुळे मैदानात युती, आघाडीचे झेंडे फडकणार की स्वबळाचा नारा देत स्वतंत्र पक्षांचे शड्डू घुमणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीमहायुतीत अनेक मित्रपक्ष असले तरी मुख्य लढत ही भाजप, दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यातच राहणार आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या कार्यक्षेत्रात आतापासून निवडणुकांच्या दृष्टीने इच्छुकांची चाचपणी सुरू झाली आहे. मात्र, पक्षीय भूमिकांवरून गोंधळ सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमार्फत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची मते विचारात घेऊन काही ठिकाणी जागा वाटपाचा तिढा सुटला नाही, तर स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.महाविकास आघाडीत मात्र अजूनही कोणतीही भूमिका ठरलेली नाही. राज्य स्तरावर याबाबतची भूमिका स्पष्ट नसल्याने आघाडीत संभ्रम आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेसमध्ये फारसे सख्य नाही. अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला दिसतात. महायुतीतही भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सूर जुळत नसल्याचे दिसून येते. काही ठिकाणी शिंदेसेनेचे तर मोजक्या ठिकाणी उद्धवसेनेचे अस्तित्व दिसून येत असले तरी प्रमुख पक्षांच्या तुलनेत ते फार नगण्य आहे.

आघाड्यांमधून पळवाट

आष्टा, इस्लामपूर नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात स्थानिक आघाड्या करून निवडणुका लढविल्या जातात. त्यामुळे महाविकास आघाडी किंवा महायुतीचा फाॅर्म्युला या परंपरेला छेद देणार की जुन्या राजकीय परंपरा कायम राखल्या जाणार, हा चर्चेचा प्रश्न आहे.चौकट

महापालिका क्षेत्रात आघाडीत पडझडसांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील महाविकास आघाडीत काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ताकद अधिक होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळली आहे. पक्ष सोडण्याकडे अनेकांचा कल आहे. जयंत पाटील यांचे अनेक समर्थक असलेले माजी नगरसेवक अजित पवार गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांची महापालिका क्षेत्रात मोठी पडझड झाल्याचे दिसून येते. दुसरीकडे भाजपची ताकद वाढली आहे.नगरपालिकांत काय होणार?

इस्लामपूर : मागील नगरपालिका निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची सत्तेपर्यंत जाताना दमछाक झाली. त्यांना काठावर जागा मिळाल्या. त्यांच्या विरोधातील विकास आघाडीने नगराध्यक्षपद पटकाविले होते. सद्यस्थितीत याठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी, भाजप, शिंदेसेना हे पक्ष ताकद आजमावणार आहेत. काँग्रेस पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट नाही.आष्टा : जयंत पाटील व दिवंगत नेते विलासराव शिंदे यांच्या आघाडीची दीर्घकाळ सत्ता आहे. याठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप काहीअंशी ताकद आहे.

जत : मागील पालिका निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित येत सत्ता घेतली होती. यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत देण्याची तयारी असली तरी दोन्हीकडील मित्रपक्षांचे सूर अद्याप जुळले नाहीत.विटा : गत निवडणुकीत काँग्रेसने सत्ता मिळविली होती. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध शिंदेसेना अशी लढत होण्याची शक्यता आहे.

पलूस : काँग्रेसने याठिकाणी गत निवडणुकीत सत्तास्थापन केली होती. आगामी निवडणुकीत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ताकद आजमावतील. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अरुण लाड, शरद लाड तसेच भाजपचे संग्रामसिंह देशमुख, पृथ्वीराज देशमुख हे नेते पालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची करणार आहेत.तासगाव : माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वात मागील निवडणुकीत भाजपने सत्ता मिळविली होती. आता संजय पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील विरुद्ध संजय पाटील यांच्यात पालिकेचा सामना रंगणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणElectionनिवडणूक 2024MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी