Sangli: चांदोली धरणाचे चारही दरवाजे उघडले, किती क्युसेकने विसर्ग सुरू.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 18:16 IST2025-07-05T18:14:33+5:302025-07-05T18:16:03+5:30

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच, धरण ८० टक्के भरले 

All four gates of Chandoli Dam opened | Sangli: चांदोली धरणाचे चारही दरवाजे उघडले, किती क्युसेकने विसर्ग सुरू.. जाणून घ्या

छाया- विकास शहा 

शिराळा : शिराळा शहरास तालुक्यात पाऊस उन्हाचा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरण ८० टक्के भरले आहे. आज, शनिवारी (दि.५) दुपारी धरणाचे चारही स्वयंचलित दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकरुड-रेठरे बंधारा अजूनही पाण्याखाली आहे.

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज, निवळे, धनगरवाडा, चांदोली येथे पाऊस सुरूच आहे. यावर्षी पाथरपुंज बरोबर निवळे येथे पावसाचे प्रमाण वाढले आहे तसेच सोळा वेळा अतिवृष्टी झाली आहे. चांदोली धरणात ११ हजार १५७ क्युसेकने आवक तर वीजनिर्मिती केंद्रातून १६३० व चार दरवाज्यातून १४७० असा एकूण ३१०० क्यूसेकने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाची नोंद

  • पाथरपुंज - ९२ मिमी (२४२४मिमी)
  • निवळे -  ८४(२२३६)
  • धनगरवाडा -४६(१३३२)
  • चांदोली - ४८ (१२९३)


सतर्कतेचा इशारा

चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. धरणातून विसर्ग सुरु केल्याने नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे -   बाबासाहेब पाटील, उपविभागीय अभियंता, वारणा धरण व्यवस्थापन

Web Title: All four gates of Chandoli Dam opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.