सांगलीत ज्येष्ठ नागरिकांचे आंदोलन

By Admin | Updated: August 11, 2015 22:16 IST2015-08-11T22:16:23+5:302015-08-11T22:16:23+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण : १६ रोजी निषेध दिन

Agitation of senior citizens of Sangli | सांगलीत ज्येष्ठ नागरिकांचे आंदोलन

सांगलीत ज्येष्ठ नागरिकांचे आंदोलन

सांगली : राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी झाली नाही. ती त्वरित करावी, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाच्या अटीशिवाय आरोग्य विमा योजना सुरू करा, आदी मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात केली. बुधवार ते शुक्रवारपर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये साखळी उपोषण सुरु रहाणार आहे. तसेच १६ आॅगस्ट हा दिवस निषेध दिन म्हणून पाळण्यात येणार असल्याचे जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीचे अध्यक्ष गोविंदराव परांजपे यांनी सांगितले.मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. यावेळी कोल्हापूर प्रादेशिक विभागाचे उपाध्यक्ष पी. के. माने, यशवंतराव चव्हाण, संघटनेचे सचिव अंजुमन खान, सहसचिव बाळासाहेब शिरोटे, कोषाध्यक्ष नरहरी बगरे, संपर्क सचिव निवृत्ती धनवडे, एल. ए. पाटील, वसंत दळवी, जगन्नाथ मोरे-पाटील, चेलनादेवी खुरपे आदी उपस्थित होते. यावेळी आंदोलनामध्ये ज्येष्ठ नागरिक धोरण अंमलबजावणीकरिता मंत्रालय, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यरत करावा, फेस्कॉम व इतर स्वयंसेवी संस्था यांच्या प्रतिनिधींचा समावेश करून महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक परिषदेची स्थापना करावी, त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असावेत, केंद्र व राज्य शासनमान्य रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधावर ५० टक्के सवलत मंजूर करावी, आदी मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. (प्रतिनिधी)

Web Title: Agitation of senior citizens of Sangli