शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक फेरीनंतर असा बदलत गेला कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:49 IST

मतमोजणीच्या ठिकाणाचे लाइव्ह चित्रण

- विश्वास मोरे

पिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघातील लढत ही चुरशीची आणि प्रतिष्ठेची होती. त्यामुळे बालेवाडी येथील मतमोजणी केंद्रावर मोठी गर्दी दिसून आली. दुपारपर्यंत ही गर्दी कमी होती. विजयाचा कल समजताच कार्यकर्त्यांनी पुन्हा गर्दी केली. दिवसभर फेरीतील कलानुसार कार्यकर्त्यांचाही उत्साहही वाढत गेला.

पहिल्या फेरीत उत्साह कमीबालेवाडी क्रीडासंकुलात कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, वाहतुकीचे नियोजन केले होते. त्यामुळे वाहतूककोंडी टळली होती. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे थांबण्याची व्यवस्था केली आहे. सुरुवातीला या ठिकाणी उत्साह कमी होता.

पाचव्या फेरीपर्यंत नेते फिरकले नाहीतम्हाळुंगे चौकी ते जिजामाता चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पाचव्या फेरीनंतर राष्ट्रवादी व युतीचे कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली. मात्र, सकाळच्या टप्प्यात दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते या ठिकाणी फिरकलेनाही.

सोळाव्या फेरीपर्यंत उत्साह होता कमीसोळाव्या फेरीनंतर मावळचा निकालाचा कल दिसू लागला. बारणे यांच्या पारड्यात अधिक मते पडत असल्याचे चित्र असताना युतीचे कार्यकर्ते बालेवाडीत येऊ लागले.

विसाव्या फेरीनंतर उत्साहविसाव्या फेरीनंतर निकाल स्पष्ट होऊ लागल्यानंतर युतीत उत्साह वाढल्याचे दिसून आले़ दुपारी ३.३० नंतर कार्यकर्ते येऊ लागले.

पंचविसाव्या फेरीनंतर उत्साहात वाढपंचविसाव्या फेरीनंतर उत्साह वाढला. ४ च्या सुमारास खासदार बारणे मतमोजणी केंद्रात आले. त्या वेळी कार्यकर्त्यांनी केंद्राबाहेर जल्लोष केला. अभूतपूर्व उत्साह दिसून येत होता. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, माजी खासदार राम ठाकूर, आमदार बाळा भेगडे, आमदार गौतम चाबुकस्वार, प्रशांत ठाकूर आदी दाखल झाले होते. या वेळी आमदार जगताप यांनी बारणे यांना मिठी मारली. पेढाही भरविला. याच वेळी डॉ. अमोल कोल्हेही आल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.बालेवाडीत शिरूर आणि मावळची मतमोजणी होती. मावळमधून बारणे तर शिरूरमधून डॉ. कोल्हे विजयी झाले. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी आणि महायुतीत एकीकडे थोडी खुशी, थोडा गम असल्याचे दिसून आले.

टॅग्स :maval-pcमावळ