शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
6
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
7
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
8
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
9
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
10
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
11
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
12
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
13
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
14
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
15
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
16
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
17
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
18
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
19
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
20
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्ही कॅमेरे, शुटिंगसह कडेकोट बंदोबस्त, तरीही कॉपीचे धाडस; सांगली जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 18:21 IST

वाणिज्य शिक्षणक्रमाच्या पेपरला कॉपी

सांगली : यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेत १०० टक्के काॅपीमुक्तीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त केला. तरीही कॉपीचा एक प्रकार सापडला. संबधित परीक्षार्थीवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

बेळंकी (ता. मिरज) येथील कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा केंद्रात वाणिज्य शिक्षणक्रमाच्या एका पेपरला कॉपीचा प्रकार निदर्शनास आला. एका विद्यार्थिनीने पॅडवर काही मजकूर कॉपी स्वरूपात लिहून आणल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले. पथकातील सदस्यांनी पॅड, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका जप्त केली. संबंधित विद्यार्थिनीला परीक्षा मंडळाच्या नियमानुसार दुसरी प्रश्नपत्रिका दिली. कारवाईचा अहवाल परीक्षा मंडळाला पाठविला. त्यानंतर आता मंडळाच्या नियमांनुसार संबंधित विद्यार्थिनीचा जबाब, पर्यवेक्षकाचा जबाब व अन्य प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, यावर्षी दहावी व बारावीच्या परीक्षा १०० टक्के काॅपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेने अनेक प्रकारचा कडेकोट बंदोबस्त केला होता. मंडळाच्या सूचनेनूसार सर्व परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. त्याद्वारे परीक्षा दालनातील परीक्षार्थींच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आले. कॅमेऱ्यातील चित्रण सांभाळून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. 

मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या संकल्पनेनुसार प्रत्येक परीक्षा दालनात मोबाइलद्वारे चित्रण करून झूम प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेतूनही त्यावर लक्ष ठेवण्यात आले होते. थोड्याशाही आक्षेपार्ह हालचाली दिसल्यास ताबडतोब पर्यवेक्षकाला सतर्क करण्यात येत होते. या उपायांची परिणीती म्हणून सर्वत्र कॉपीमुक्त परीक्षा झाल्या. पण बेळंकी महाविद्यालयातील एका कॉपी प्रकरणाने या उपायांमधील त्रुटी समोर आणल्या. पुढील परीक्षांमध्ये आणखी काटेकोर उपायांची गरज असल्याचे दाखवून दिले.

कोल्हापूर परीक्षा मंडळाच्या कार्यकक्षेत यावर्षी कॉपीचे एकमेव प्रकरण आढळले. बारावीच्या परीक्षेत सांगली जिल्ह्यातील एका केंद्रात एक परीक्षार्थी कॉपी करताना सापडला. त्याच्यावर नियमानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. - राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, कोल्हापूर व कोकण विभागीय परीक्षा मंडळ

English
हिंदी सारांश
Web Title : CCTV, Strict Security Fail; Student Caught Cheating in Sangli

Web Summary : Despite strict security, a student in Sangli was caught cheating during the 12th-grade exam. The incident occurred at Belanki College. Authorities seized the evidence and initiated action per board rules, highlighting security loopholes.