शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी घरटी टांगण्याचा उपक्रम चुकीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:25 IST

मिरज : आकाशात विहरणाऱ्या स्वच्छंद पक्ष्यांनाही विसावणारं घरटं हवं असतं. उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी टांगण्याचा उपक्रम ...

मिरज : आकाशात विहरणाऱ्या स्वच्छंद पक्ष्यांनाही विसावणारं घरटं हवं असतं. उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी टांगण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. मानवनिर्मित घरट्यांची पक्ष्यांसाठी उपयुक्तता किती? याबाबत पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांत मतभेद आहेत. मार्चपासून उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी मिळावे म्हणून पक्षीप्रेमींना घरटे देऊन पक्ष्यांना उन्हापासुन वाचवून पाणी व चाऱ्याची सोय करण्यात येत आहे. मात्र, मानवनिर्मित कृत्रिम घरटे पक्ष्यांसाठी व निसर्ग संवर्धनासाठी उपयुक्त नसल्याचा पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे.

पक्ष्यांची घरटी हा कलाकुसरीचा अत्यंत सुंदर नमुना असतो. काड्या जमवून पक्षी स्वतः कलाकुसर करून ऊन-पावसापासून रक्षण करणारं घरटं बांधतात. सांगलीतील संवेदना व अवनि फौंडेशनने पक्ष्यांसाठी घरटे हा उपक्रम सुरू केला आहे. काही संस्था घरातील १५ किलोचा तेलाचा पत्र्याचा डबा आणून देणाऱ्या इच्छुक पक्षी मित्रांना मोफत घरटे तयार करून देत आहे. मिरजेतील पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र जोशी म्हणाले, पक्ष्यांना वाचवण्याचं एक प्रतीक म्हणून सध्या पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी तयार करून ती झाडांवर, घरांवर, खांबांवर, कुंपणांवर लावण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. पक्ष्यांसाठी घरटी लावणं म्हणजे पर्यावरण संरक्षण, या समजातून व्यक्ती व संस्था हा उपक्रम राबवत आहेत. जिथे भरपूर झाडं आहेत, जुन्या, मोठ्या झाडांना ढोली, भोकं, फटी आहेत, अशा ठिकाणी घरटी लावण्याची आवश्यकता नाही. ही घरटी लावण्यापूर्वी तिथे घरट्यांचा वापर करण्याची शक्यता असलेल्या पक्ष्यांच्या जाती अस्तित्वात आहेत की नाहीत, हे पाहणे आवश्यक आहे. कृत्रिम घरटी चिमणींपेक्षा लहान आकाराच्या पक्ष्याला उपयुक्त ठरणार नाहीत. तीन पट्टेवाल्या खारींना पिलं घालण्यासाठी या घरट्यांत जागा उपलब्ध होऊन हळूहळू खारींची संख्या वाढणार आहे. या खारी पक्ष्यांची अंडीपिल्ली साफ करून त्यांच्या मुळावर येऊ शकतात.

कृत्रिम घरटी लावण्यापेक्षा आहे त्या वृक्षसंपदेचं जतन आणि संवर्धन करण्यास प्राधान्य दिलं पाहिजे.

चाैकट

महापालिकेची निर्मिती होऊन २० वर्षे उलटल्यानंतरही महापालिका क्षेत्रात अद्याप वृक्षगणना झालेली नाही. मात्र, महापालिकेच्या सुमारे २५ चौरस किलोमीटर क्षेत्रात सुमारे तीन लाख वृक्ष असल्याचा अंदाज आहे. यापैकी ७५ टक्के वृक्ष खासगी जागेत आहेत. रस्त्याकडेच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड झाली असून, सार्वजनिक जागेत चिंच, बाभळ, गुलमोहोर, रेनट्री, पिंपळ या जातीचे वृक्ष शिल्लक आहेत. या परिस्थितीत झाडे वाचवली तरी पक्ष्यांना आधार मिळणार आहे.