शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

'लाडकी बहीण'साठी झिरो बॅलन्सवर खाती उघडणार- मानसिंगराव नाईक

By अशोक डोंबाळे | Updated: July 10, 2024 18:17 IST

जिल्हा बॅँकेच्या सर्व शाखांमध्ये योजना

सांगली : शासनाच्या लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये महिलांची झिरो बॅलन्सवर बचत खाती उघडण्यात येणार आहेत. याचा लाभार्थी महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

मानसिंगराव नाईक म्हणाले, जिल्हा बँक केंद्र व राज्य शासनाकडून जाहीर होणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये नेहमीच अग्रेसर आहे. शेतकरी, महिला, तरुण यांच्यासह समाजातील सर्वच घटकांतील लाभार्थींना शासनाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळेल, यासाठी बॅँक प्रयत्नशील असते. शासनाने आता महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे बॅँकेत बचत खाते असणे गरजेचे आहे. शहरासह ग्रामीण भागात अनेक महिलांची बँक खाती नाहीत. नवीन खाती उघडताना किमान रक्कम शिल्लक ठेवावी लागतात. मात्र, आता जिल्हा बॅँकेने लाडकी बहीण योजनेसाठी खाती उघडणाऱ्या महिलांची शून्य रक्कम (झिरो बॅलन्स) खाती उघडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्ह्यातील बँकेच्या सर्व शाखांना कळविण्यात आले आहे. कोणीही महिला बँक खाते काढण्यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे.मुलींच्या लग्नासाठी बँकेची 'लग्नगाठ कर्ज योजना'मुलींच्या लग्नासाठी जिल्हा बँक ६ टक्के व्याजदराने सोसायटीमार्फत ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज देणार आहे. यासाठी बँकेने लग्नगाठ कर्ज योजना सुरू केली आहे. याबाबतचे परिपत्रक सर्व शाखांना पाठविले आहे. या योजनेसाठी बॅँकेने कोरडवाहू क्षेत्रावर प्रतिएकर २० हजार रुपये, तर बागायती क्षेत्रावर ३० हजार रुपये मात्र जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा गरजूंनी लाभा घ्यावा, असे आवाहन मानसिंगराव नाईक यांनी केले.

टॅग्स :SangliसांगलीMansingrao Naikमानसिंगराव नाईक