शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: पाच लाख दे, नाही तर ॲट्रॉसिटी दाखल करण्याची दिली धमकी; तिघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 14:13 IST

सांगली : पाच लाख खंडणी दे, नाही तर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देण्याचा प्रकार माधवनगर (ता. मिरज ...

सांगली : पाच लाख खंडणी दे, नाही तर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देण्याचा प्रकार माधवनगर (ता. मिरज ) येथे घडला. हा प्रकार शुक्रवारी (दि. २५) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी नवीन राजेंद्र शहा (वय ४४, रा. माधवनगर) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सनोबर खान ( रा. माधवनगर), अशोक कसबे यांच्यासह तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत.नवीन शहा हे आपल्या कुटुंबियांसह माधवनगर परिसरातील सोमवार पेठ परिसरात राहतात. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संशयितांनी संगनमत करून नवीन यांच्या भावाच्या मोकळ्या प्लॉटमध्ये जबरदस्तीने घुसखोरी केली. मेहुल यांना ''रिकामा प्लॉट देऊन टाक, नाही तर आताच्या आता पाच लाख रुपयांची खंडणी दे'' अशी धमकी दिली. ''नाही तर तुझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो'' असेही धमकावले. नवीन व भाऊ हर्षल यांनी प्लॉट देण्यास नकार दिला असता शिवीगाळ करत कसबे याने बेदम मारहाण केली. घडलेल्या या घटनेनंतर नवीन यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता ३०८ (२), ३०८ (३), ३२९ (३), ११८ (१), ११५ (२), ३५२, ३ ५१ (२) नुसार गुन्हे दाखल केले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस