शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
3
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
4
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
5
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
6
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
7
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
8
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
9
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
10
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
11
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
12
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
14
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
15
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
16
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
17
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
18
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
19
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
20
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Accident News: नशेत बेदरकारपणे मोटार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा, दोन चिमुकल्यांसह १५ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 17:53 IST

जमावाने केलेल्या हल्ल्यात चालक जखमी

सांगली : दारूच्या नशेत बेदरकारपणे मोटार चालवून १५ जणांना जखमी करत पाच मोटारी, दोन दुचाकींचे नुकसान करणाऱ्या चालक प्रणिकेत दत्तात्रय पांचाळ (वय २६, रा. कुलस्वामी रस्ता, लातूर) याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक पोलिस लखन होवाळे यांनी फिर्याद दिली. जमावाने केलेल्या हल्ल्यात पांचाळ जखमी झाला असून, त्याच्यावर सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत.

मोटारचालक पांचाळ हा पुणे येथून प्रवासी घेऊन सांगलीत आला होता. सायंकाळी सातच्या सुमारास त्याने नशेत आपल्या ताब्यातील मोटार (क्र. एमएच १४ एलबी ४९००) चालवली. पटेल चौक ते गणपती मंदिर, टिळक चौक या मार्गावर त्याने वाहनांना धडक देत कृष्णामाई महाेत्सवाच्या बंदोबस्तासाठी नेमणुकीस असलेल्या चार पोलिसांसह १५ जणांना धडक देऊन जखमी केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

चालक पांचाळ याने नशेत बेदरकारपणे मोटार चालवून पाच मोटारींना तसेच दोन दुचाकींना धडक देत मोठे नुकसान केले आहे. टिळक चौकात एका दुचाकीला धडक देऊन त्याची मोटार थांबल्यानंतर संतप्त जमावाने त्याला मोटारीतून बाहेर ओढत मारहाण केली. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून सुटका करत चालक पांचाळ याला ताब्यात घेतले. उपचारासाठी सिव्हिलमध्ये त्याला दाखल केले. वैद्यकीय तपासणीत पांचाळ याने दारू प्यायल्याचे स्पष्ट झाले आहे. दारूच्या नशेत वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिस कर्मचारी लखन होवाळे यांनी फिर्याद दिली. सहायक फौजदार अमोल लोहार अधिक तपास करत आहेत.

प्रवासी घेऊन सांगलीत आला होता

चालक पांचाळ हा पुण्यातून प्रवासी घेऊन सांगलीत आला होता. प्रवाशांना तो छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सोडणार होता. परंतु, वाटेत त्याने दारू प्यायल्यामुळे प्रवाशांनी त्याला खडसावले होते. सांगलीत प्रथमच आल्यामुळे त्याला रस्ते माहीत नव्हते. पटेल चौकातून त्याने बेदरकारपणे मोटार चालवत वाहनांसह पोलिसांना धडक दिली. जमावाने त्यास पकडल्यानंतर वाहनातील प्रवासी निसटले.

जखमींमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश

चालक पांचाळ याने १५ जणांना धडक देत जखमी केले. यात अमया राजेंद्र खोत (वय ७) व वंदन सुनील फराटे (वय ३) या दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Drunk Driver Injures 15, Including Children, in Sangli Accident

Web Summary : A drunk driver in Sangli injured 15 people, including two children, and damaged multiple vehicles. The driver, Pranket Panchal, was arrested after being assaulted by an angry mob. Police are investigating the incident, which occurred near Tilak Chowk during a festival.