शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
6
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
7
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
8
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
9
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
11
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
12
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
13
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
14
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
15
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
17
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
18
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
19
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
20
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: करगणीत दहावीतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपविले जीवन, कॉल रेकॉर्डवरून पोलिसांचा तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 15:53 IST

कारण अस्पष्ट, युवकाने त्रास दिल्याची चर्चा

आटपाडी : करगणी (ता. आटपाडी) येथील पाटील मळा परिसरात राहणाऱ्या सायली महादेव सरगर (वय १६) या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी साडेसहा वाजता घडली. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असले तरी मृत सायलीवर कोणाचा दबाव होता का, तिला कोणी त्रास दिला का, याचा शोध पोलिस घेत आहेत. यासाठी तिच्या कॉल रेकॉर्डची माहिती घेण्यात येत आहे.याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात बीएनएस कलम १९४ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती सायलीच्या नातेवाइकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक विनय बहिर, पोलिस उपनिरीक्षक राजीव केंद्रे व पथकाने पाहणी केली. सहायक पोलिस उपनिरीक्षक एम. एम. आवळे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.मृत सायली करगणी येथील बनपुरी रोडवरील पाटील मळा परिसरात राहत होती. ती दहावीत शिकत होती. रविवारी (दि. ७) सकाळी राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. त्यानंतर काही वेळाने कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब आली.सायलीच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. यासंदर्भात तिचे वडील सचिन सीताराम सरगर (४२, रा. करगणी) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

युवकाने त्रास दिल्याची चर्चाआत्महत्या केलेल्या मुलीस एका युवकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज करून त्रास दिल्याची चर्चा गावात सुरू असून, त्याबाबतही पोलिसांचा तपास सुरू आहे.