शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

बालगंधर्व स्मारकासाठी ५० लाखांचा निधी मंजूर

By admin | Updated: July 26, 2015 00:17 IST

‘लोकमत’ इफेक्ट : नागठाण्यातील रखडलेल्या बांधकामास मिळणार गती

सांगली : नागठाणे (ता. पलूस) येथील नटसम्राट बालगंधर्व स्मारकाचे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाने तातडीने ५० लाखांचा निधी शनिवारी मंजूर केला. चालू वर्षात कोणत्याही परिस्थितीत हा निधी खर्च करण्याची सूचना राज्य शासनाने दिली आहे. मराठी संगीत रंगभूमीला तेजोवलय प्राप्त करून देणाऱ्या बालगंधर्वांच्या व्यक्तिगत आयुष्यात ज्यापद्धतीने संघर्ष वाट्याला आला, त्याचपद्धतीचा संघर्ष त्यांच्या जन्मगावी असलेल्या स्मारकाच्या वाट्याला आला आहे. बालगंधर्वांच्या पावलांनी रंगभूमी पावन झाल्याच्या गोष्टीला ११० वर्षे उलटली तरी, त्यांच्याच जन्मगावी त्यांच्या नावाचे स्मारक उभे राहू शकलेले नाही. राजकीय नेत्यांची अनेक भव्य स्मारके राज्यभरात उभारली जात असताना, रंगभूमीला सुवर्णकाळ दाखविणाऱ्या या महान कलाकाराच्या स्मारकाला आणि नाट्यगृहाला शासनाच्या निधीसाठी ताटकळत रहावे लागत आहे. ‘लोकमत’ने १५ जुलैरोजी बालगंधर्वांच्या स्मृतिदिनी या गोष्टीवर प्रकाशझोत टाकला होता. मतदारसंघातील आ. पतंगराव कदम यांनीही या गोष्टीची दखल घेत शासनाकडे निधीची मागणी केली होती. राज्य शासनाने याची दखल घेत आता तातडीने ५० लाखांचा निधी मंजूर केला होता. स्मारकाच्या उभारणीचा प्रश्न २००५ पासून प्रलंबित आहे. जागेचा वाद मिटल्यानंतर नागठाणेच्या स्मारक उभारणीच्या कामास १७ फेब्रुवारी २००९ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. ३ कोटी ४६ लाखांच्या कामास त्यावेळी मंजुरी मिळाली होती. मंजुरी मिळाल्यानंतरही स्मारकाचे काम सुरू होण्यासाठी तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागली. १६ आॅक्टोबर २०१२ रोजी बांधकामास सुरुवात झाली. ४२ लाख ६० हजार रुपयांचे पाईल्स व पिलरचे काम झाल्यानंतर काम पुन्हा थांबले. आता शासनाच्या निधीसाठी प्रशासकीय पाठपुरावा सुरू आहे. स्मारकासाठी झालेल्या बैठकीलाही आता वर्ष उलटले आहे. निधीसाठी अनेकदा शासनाचे उंबरे झिजविण्यात आले. शासनाने ५० लाखांचा निधी चालूवर्षी तातडीने खर्च करण्याचे आदेश दिले आहेत. बांधकामाचा हा निधी असला तरी तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग न करता संबंधित तहसीलदारांकडे देऊन तो खर्च करावा. तहसीलदारांना यासाठी संवितरण अधिकारी म्हणू नेमावे, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे बालगंधर्वांच्या स्मारकाचे रखडलेले काम आता मार्गी लागणार आहे. (प्रतिनिधी)