जिल्ह्यात कोरोनाचे ४९८ नवे रुग्ण; वीस जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:29 IST2021-08-26T04:29:19+5:302021-08-26T04:29:19+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कायम असतानाच, बुधवारी कोरोना मृत्यूसंख्येने पाच हजारांचा टप्पा पार केला. दिवसभरात नवीन ४९८ रुग्णांची ...

498 new corona patients in the district; Twenty people died | जिल्ह्यात कोरोनाचे ४९८ नवे रुग्ण; वीस जणांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाचे ४९८ नवे रुग्ण; वीस जणांचा मृत्यू

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कायम असतानाच, बुधवारी कोरोना मृत्यूसंख्येने पाच हजारांचा टप्पा पार केला. दिवसभरात नवीन ४९८ रुग्णांची नोंद झाली. मृत्यू संख्येतील वाढ अद्यापही कायम असून, परजिल्ह्यातील ४ जणांसह जिल्ह्यातील १६ अशा २० जणांचा मृत्यू झाला. ५४५ जण कोरोनामुक्त झाले.

जिल्ह्यातील मृतांच्या संख्येतील वाढ कायमच असून, १६ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली १, कुपवाड २, तासगाव तालुक्यातील ६, मिरज तालुक्यातील ५ तर कवठेमहांकाळ, पलूस तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

आरोग्य विभागाने बुधवारी आरटीपीसीआर अंतर्गत ५२४० जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात २६५ जण बाधित आढळले तर रॅपिड ॲन्टिजनच्या ६५४२ जणांच्या नमुने तपासणीतून २४१ जण पॉझिटिव्ह आढळले.

उपचार घेत असलेल्या ४१३८ जणांपैकी ५७८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४८४ जण ऑक्सिजनवर तर ९४ जण व्हेंटीलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील ४ जणांचा मृत्यू तर नवीन ८ रुग्ण उपचारास दाखल झाले.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १९००७३

उपचार घेत असलेले ४१३८

कोरोनामुक्त झालेले १८०९३०

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ५००५

बुधवारी दिवसभरात

सांगली ५६

मिरज ११

आटपाडी ४९

कडेगाव ६१

खानापूर ५६

पलूस १६

तासगाव ५३

जत २०

कवठेमहांकाळ ४५

मिरज तालुका ८५

शिराळा ८

वाळवा ३८

Web Title: 498 new corona patients in the district; Twenty people died