शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

३४२ मंडळांचा गणरायाला निरोप!

By admin | Updated: September 24, 2015 00:02 IST

सांगली, मिरजेत मिरवणूक : मिरजेत अकराव्या दिवशीच्या विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे

सांगली/मिरज : ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ, पुढच्यावर्षी लवकर याऽऽ’च्या जयघोषात सांगली व विश्रामबाग परिसरातील २७७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बुधवारी गणरायाला निरोप दिला. कृष्णा घाटावर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरु होत्या.सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १०७ मंडळांच्या ‘श्रीं’चे विसर्जन झाले. यापैकी ३८ मंडळांनी मिरवणुकीने गणरायाला निरोप दिला. संजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील ८३ मंडळांच्या ‘श्रीं’चे विसर्जन झाले. ३३ मंडळांनी मिरवणूक काढली होती. विश्रामबाग हद्दीतील ८७ मंडळांच्या ‘श्रीं’चे विसर्जन झाले. ४० मंडळांनी मिरवणूक काढली होती. सायंकाळी सहा वाजता मिरवणूक निघाली होती. डॉल्बीचा वापर टाळण्यात आला होता. झांजपथक, बॅन्ड, बँजो व लेझीम या पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यात आला होता. मिरवणूक मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. काही प्रमाणात घरगुती गणपतींचेही आज विसर्जन झाले. मिरज : मिरजेत बुधवारी ६५ सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन गणेश तलावात व कृष्णाघाटावर करण्यात आले. दुपारपासून सुरू झालेल्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. दरम्यान अकराव्या दिवशीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गावर ३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सार्वजनिक मंडळांनी बॅन्ड, बँजो, झांजपथक, ढोलपथकाच्या तालावर ‘मोरयाऽऽ’च्या गजरात मिरवणुका काढल्या. ५० मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन गणेश तलावात, तर १५ मंडळांनी कृष्णा नदीपात्रात मूर्तीचे विसर्जन केले. कृष्णाघाटावर विसर्जनासाठी क्रेन, तराफ्यांची सोय केली होती. तलावात दोन्ही बाजूंनी विसर्जन व्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षा उपाययोजना म्हणून अग्निशमन दलाने तलावात यांत्रिक बोटीची व्यवस्था केली होती. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त होता. पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, प्रांताधिकारी सुभाष बोरकर, तहसीलदार किशोर घाडगे, उपायुक्त सुनील नाईक, सहायक आयुक्त टीना गवळी यांच्या पथकाने मिरवणूक मार्गाची पाहणी केली. (प्रतिनिधी)